Horoscope Today, 6th November : आज ६ नोव्हेंबरला कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी बुधवारी रात्री १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत राहील. आज सुकर्म योग सकाळी १० वाजून ५१ मिनिटांपर्यंत राहील. मूळ नक्षत्र दुपारी ११ वाजून २ मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ १२ सुरु होईल याशिवाय दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांनी शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. तर आजचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

६ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- धार्मिक वा आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन ज्ञान गोळा करण्याकडे कल राहील. अनेक प्रश्नांची उकल काढता येईल. स्वत:साठी वेळ काढावा. तज्ञ लोकांशी संपर्क साधावा.

mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

वृषभ:- आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. स्त्रीवर्गाशी जरा जपून वागावे. सहकार्‍यांशी सामंजस्याने वागावे. उगाचच हुरळून जाऊ नका.

मिथुन:- आजचा दिवस ताजातवाना असेल. नवविवाहिताना सरप्राइज मिळेल. व्यवसायिकांना चांगला फायदा मिळेल. वरिष्ठांकडून दाद मिळेल. चारचौघात कौतुक केले जाईल.

कर्क:- विरोधकांपासून सावध राहावे. छुपे शत्रू त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. योग साधना करावी. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.

सिंह:- व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल. नवीन संधी चालून येईल. विद्यार्थ्यांना नवीन आव्हान स्वीकारता येईल. तुमची एकाग्रता वाढेल. जोडीदाराला खुश ठेवता येईल.

कन्या:- जमिनीशी संबंधित व्यवहार पार पडेल. कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील. घरातील लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. साफसफाईची कामे काढाल. मन प्रसन्न राहील.

तूळ:- पराक्रमात वाढ होईल. तुमची ऊर्जा पाहून लोक अचंबित होतील. सहकारी वर्ग तुमच्यावर प्रभावित होईल. कामासंबंधी प्रवास करावा लागेल. ओळखीचे लोक भेटतील.

वृश्चिक:- देणी फेडता येतील. तसेच नवीन गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. बोलण्यात गोडवा ठेवाल. आवडीच्या गोष्टी कराल.

धनू:- बुद्धीच्या जोरावर नवीन कामे कराल. दिवस मनाजोगा घालवाल. आवडते छंद जोपासाल. मानसिक दृष्ट्‍या सक्षम व्हाल. धार्मिक कामात सहभागी व्हाल.

मकर:- प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वायफळ खर्च केला जाऊ शकतो. जुन्या विचारात अडकून राहू नका. नकारात्मकता दूर सारावी. दूरच्या नातेवाईकाशी संपर्क होईल.

कुंभ:- विविध स्तरातून लाभ संभवतो. मनातील इच्छा पूर्ण कराल. जवळच्या मित्रांची गाठ घ्याल. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. शेअर बाजारातून नफा मिळवू शकाल.

मीन:- रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच वैयक्तिक काम तडीस न्याल. वडीलांशी संबंध सुधारतील. कामात चंचलता आड आणू नका. हातातील कामातून समाधान मिळेल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )

Story img Loader