Shadashtak yoga: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. नवग्रहामध्ये शनी हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून आता त्याची दृष्टी ग्रहांचा राजा सूर्यावर पडत आहे. ज्यामुळे षडाष्टक योग निर्माण झाला आहे. शनीच्या सूर्यावरील दृष्टीमुळे काही राशीच्या व्यक्तींना त्याचे अशुभ परिणाम पाहायला मिळतील. तर काही राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभही होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात, अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते.

Saturn transit 2024 in Aquarius
येणारे १५३ दिवस शनीच्या कृपेने दारी नांदणार लक्ष्मी; ‘या’ चार राशींचे व्यक्ती कमावणार बक्कळ पैसा
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Cyclone Dana which formed in Bay of Bengal is now just few kilometers off coast of Odisha
‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा; ‘दाना’ चक्रीवादळ मध्यरात्रीनंतर…
Surya In Tula Rashi
पुढील काही तासांत सूर्याचा जबरदस्त प्रभाव; स्वाती नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ राशींचे चमकणार भाग्य
Rahu and mangal created Navpancham Rajyog before diwali
दिवाळीपूर्वी नवपंचम राजयोगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब, राहु आणि मंगळाच्या कृपेने मिळणार पैसाच पैसा
Daily Horoscope 22nd October 2024 Rashibhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya : आजचा सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींवर करणार धनाचा वर्षाव अन् वाढवेल मान, सन्मान; बुधवारी कुणाचं नशीब चमकणार?
guru gochar in taurus Diwali 2024 | guru vakri 2024
दिवाळीपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब, १२ वर्षांनंतर गुरुच्या वक्रीमुळे मिळणार अपार पैसा अन् यश
Shukra Gochar In Makar
Shukra Gochar In Makar: शुक्र करणार मकर राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार, मिळणार पैसाच पैसा

दोन राशीच्या व्यक्तींसाठी षडाष्टक योग नुकसानदायक

कर्क

षडाष्टक योग कर्क राशीच्या व्यक्तींना नकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या राशीत ग्रहांचा राजा सूर्य तिसऱ्या घराचा स्वामी असून तो कर्क राशीच्या चौथ्या घरात गोचर करत आहे. तसेच या घरात केतूदेखील विराजमान आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील वरिष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आयुष्यात अडचणी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असतील. तणावाचा सामना करावा लागेल. तसेच व्यर्थ पैसे खर्च होतील. त्यामुळे या काळात शांत राहून प्रत्येक निर्णय घ्या, कोणत्याही कामाच घाई करू नका. स्वार्थी लोकांपासून दूर रहा.

हेही वाचा: नवरात्रीनंतर पैसाच पैसा! सूर्याच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार यश, मानसन्मान आणि भौतिक सुख

कन्या

षडाष्टक योग कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अनेक अडचणी निर्माण करणारा असेल. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, वाणीवर नियंत्रण ठेवा. या काळात कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना सांभाळून चालवा. तसेच या काळाता कुटुंबात कोणतेही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. शत्रूंपासून सावध राहा आणि मनातील गोष्टी इतरांना सांगण्याआधी विचार करा. आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वायफळ खर्च करू नका. तसेच कुठेही गुंतवणूक करण्यापासून दूर रहा.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)