Shani Dev 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी देव २०२३ मध्ये कुंभ राशीत विराजमान झाले होते तर २०२४ मध्ये सुद्धा शनी महाराज कुंभ राशीत भ्रमण करणार आहेत. या कालावधीत शनी राशीबदल होणार नसला तरी त्यांची चाल बदलणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये शनी देव चांदीच्या पावलाने भ्रमण करणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात शनी कुंभसहित मार्गी झाले होते म्हणजेच भ्रमण कक्षेत १८० अंशात त्यांनी प्रवास सुरु केला होता. काही राशींच्या कुंडलीत शनीचा शुभ प्रभाव असणार आहे.
जेव्हा शनि संक्रमणाच्या वेळी चंद्र शनीपासून दुसऱ्या, पाचव्या आणि ९ व्या भावात असतो तेव्हा त्याला चांदीचे पाय म्हणतात. ज्योतिष शास्त्रात हे खूप शुभ मानले जाते. शनी देव या कालावधीत चांदीच्या पावलांनी तीन राशीत भ्रमण करणार आहे, चांदीचे पाऊले ही शुभ मानली जातात. या मंडळींना प्रचंड धनलाभासह, नोकरीत प्रगतीचे सुद्धा संकेत आहेत. या तीन नशीबवान राशी कोणत्या हे पाहुया…
शनीदेव चांदीच्या पावलांनी ‘या’ राशींच्या कुंडलीत करतील भ्रमण, ‘या’ राशींचं होईल सोनं
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
शनीदेव रजत पावलांनी गोचर करत असताना कर्क या राशीतील लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्याता आहे. आरोग्याला जडलेले जुने आजार दूर होण्याची चिन्हे आहेत. शनीदेव तुमच्या गोचर कुंडलीच्या दुसर्या स्थानात गोचर करत आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. शनी देव शेवटच्या अंशात येणार असल्याने तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, या कालावधीत आत्मविश्वास वाढल्याने तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळू शकते. या वाढलेल्या विश्वासाला जर तुम्ही योग्य शब्दांची जोड दिली तर कर्क राशीला या कालावधीत कोट्याधीश होण्याची संधी लाभू शकते.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
या राशीतील लोकांवरचा शनिच्या ढय्याचा प्रभाव कमी झाला आहे. शनीदेव या राशीतून चांदीच्या पाऊलांनी भ्रमण करताना काही विशिष्ट व्यवसायातील व्यक्तींना लाभ मिळवून देऊ शकतात. डॉक्टर, इंजिनिअरिंग आणि सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्यांसाठी, हा काळ चांगला ठरू शकतो. या काळात तुमची अधिकारी लोकांशी ओळख होऊ शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थिती असू शकते. संभाषणाला पर्याय ठेवू नका. कारण, राहु देव तुमच्या राशीपासून सातव्या स्थानावर आहेत. त्यामुळे वादविवाद शक्यतो टाळा. तुम्हाला येत्या काळात जुन्या कर्मांचे फायदे मिळू शकतात.
हे ही वाचा<< Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवारपासून ‘या’ व्रतकथेचे पठण देते अपार लक्ष्मीकृपा, यंदाचे शुभ मुहूर्त
मीन रास (Pisces Rashi Bhavishya)
मीन राशीतही शनिदेव चांदीच्या पाऊलांनी प्रवेश करत आहेत. शनीदेव या राशीच्या गोचर कुंडलीच्या भाग्य स्थानात आहेत. ज्यामुळे तुम्ही नशीबवान ठरू शकता. तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडे जास्त कष्ट सहन करावे लागू शकतात, पण या कष्टाचे फळ अत्यंत लाभदायक मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. पगारवाढीचा योग आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना काही महत्त्वाची पदे मिळू शकतात तसेच मान-सन्मान वाढण्याचीही शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

