Shani In Purva Bhadrapada Nakshatra: ज्योतिषशास्त्रात शनि हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. हा असा ग्रह आहे जो सर्वात हळू चालतो आणि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. याचबरोबर शनीला साडे साती आणि ढैय्या अधिकार आहे. राशीच्या चिन्हाव्यतिरिक्त, शनि देखील एका विशिष्ट कालावधीनंतर नक्षत्र बदलतो. शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी ३:५५ वाजता शनीने पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आणि ३ ऑक्टोबरपर्यंत या नक्षत्रात राहील. परंतु या नक्षत्रातील टप्पे वेळोवेळी बदलत राहतील. त्याचप्रमाणे शनीने १२ मे रोजी पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या पदात किंवा टप्यात प्रवेश केला होता आणि १८ ऑगस्ट रोजी रात्री १०.०३ पर्यंत या राहील. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना शनीच्या प्रकोपापासून स्वतःला वाचवावे लागेल, तर काही राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळतील. चला जाणून घेऊया पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात शनीच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना मोठा फायदा होईल…

पूर्वाभाद्रपद नक्षत्र हे २७ नक्षत्रांपैकी २५ वे नक्षत्र मानले जाते. या नक्षत्राचा स्वामी गुरू आहे.

मेष

या राशीच्या लोकांसाठी पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय स्थानात शनीचा प्रवेश लाभदायक ठरू शकतो. आर्थिक तंगीपासून दिलासा मिळेल. याचसह वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. त्यामुळे समाजात मान-सन्मान वाढेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे परत मिळू शकतात. यामुळे संपत्तीत वाढ होईल. नोकरदार लोकांनाही लाभ मिळू शकतो. वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदी करण्याची योजना आखू शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील आणि मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकेल.

हेही वाचा –शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? ८८ दिवस मिळेल भरपूर पैसा? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

कन्या

पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या टप्यात शनीचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. प्रदीर्घ न्यायालयीन खटल्यांमधून दिलासा मिळेल. यामुळे आता जुन्या गुंतवणुकीत यश मिळू शकते. आर्थिक तंगीपासून दिलासा मिळेल. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. कामानिमित्त काही प्रवास करावा लागू शकतो. पण यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

हेही वाचा – १ जूनला निर्माण होणार ‘हा’ राजयोग; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना होणार ऐश्वर्य, धन-संपत्ती आणि भौतिक सुखाची प्राप्ती

कुंभ

पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. पण काही सहकाऱ्यांना हे पचणार नाही, त्यामुळे थोडी काळजी घ्या. तुम्ही प्रत्येक आव्हानावर सहज मात कराल. कुटुंबात चांगला वेळ घालवाल. शनीच्या सादे सतीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना व्यवसायात केलेल्या मेहनतीचा फायदाही मिळेल.