Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनीदेवाला न्याय देवता असे म्हटले जाते. जो वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, कर्मचारी, नोकर इत्यादींचा कारक मानला जातो. जेव्हा शनी चाल बदल करतो तेव्हा प्रत्येक क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसून येतो. यात शनीदेव जुलैमध्ये वक्री होणार आहेत, ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. परंतु, अशा तीन राशी आहेत ज्यांचे नशीब या काळात बदलू शकते. संपत्तीत वाढ होऊ शकते. पण, नेमका कोणत्या राशींना याचा फायदा होईल जाणून घेऊ…
कुंभ
शनीदेवाची वक्री चाल कुंभ राशीसाठी सकारात्मक ठरू शकते. या काळात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होईल. जर तुम्ही लेखन, पत्रकारिता किंवा अध्यापनाशी संबंधित असाल तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येईल. तुमचे संवाद कौशल्य आणि बुद्धिमत्ता सर्वत्र चर्चेत येईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीदेवाची वक्री चाल करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत सकारात्मक ठरू शकते. या काळात काम आणि व्यवसायात विशेष प्रगती साधू शकता. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांनी या संधीचा फायदा घेण्यास चुकवू नये. जर तुम्ही सरकारी निविदा मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. सरकार आणि प्रशासनात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. दुसरीकडे नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते.
मीन
शनीदेवाची वक्री चाल मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. वाहन आणि संपत्तीचे सुख मिळू शकते. त्याचवेळी तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचे सुख मिळू शकते. तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल. मोठी ध्येये साध्य करण्यासाठी आणि नवीन योजना आखण्यासाठी हा उत्तम काळ आहे. त्याच वेळी जर तुमचे काम-व्यवसाय रिअल इस्टेट, तेल, लोखंड आणि खनिजांशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.