10th August 2024 Panchang And Rashibhavishya : १० ऑगस्ट २०२४ रोजी पहिला श्रावणी शनिवार आहे. आज श्रावण शुल्क पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी आज पहाटे ५ वाजून ४६ मिनिटांपासून सुरू होईल ते रात्रीपर्यंत असणार आहे. तर दुपारी २ वाजून ५२ मिनिटांपर्यंत साध्य योग राहील. तसेच उद्या (११ ऑगस्ट, रविवार) रोजी सकाळ पर्यंत पाच वाजून ४९ मिनिटांपर्यंत पर्यंत चित्रा नक्षत्र राहील. तर आजचा राहू काळ सकाळी ९ वाजून ०५ सुरु होईल ते सकाळी १० वाजून ४२ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांपासून सुरु होईल ते दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर महिन्याचा पहिला श्रावणी शनिवार कोणत्या राशीसाठी फलदायी ठरेल जाणून घेऊ या…

१० ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

मेष:- आपल्या तत्ववादी स्वभावाला मुराद घालावी लागेल. नवीन वाचन वा लिखाण चालू करावे. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. फिरायला जाण्याची संधी मिळेल. नवीन ओळख होईल.

वृषभ:- घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. खाण्या-पिण्याची रेलचेल होईल. व्यापार्‍यांनी आळस दूर सारावा. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. सामाजिक कामात सहभागी होता येईल.

मिथुन:- सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. मित्रांशी सलोख्याने वागावे. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. निराशाजनक विचार करू नका. जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक बाजू संतुलित ठेवावी.

कर्क:- गरज नसताना आक्रमक होऊ नका. बौद्धिक कौशल्य दाखवा. घरातून काम करण्याची संधी चालून येऊ शकते. नवीन प्रस्तावांकडे लक्ष ठेवावे. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.

सिंह:- मुलांचे प्रेम वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्साहाने कार्यरत राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कन्या:- बोलण्यातून लोकसंग्रह वाढवाल. घरातील लोकांशी सल्लामसलत करावी. सहकार्‍यांचे उत्तम सहकार्य लाभेल. रचनात्मक कामे करावीत. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.

तूळ:- जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. छोटे प्रवास घडतील. वैयक्तिक समस्या सोडवता येतील. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते.

वृश्चिक:- मनाची चलबिचलता जाणवेल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या. तरूणांशी मैत्री वाढेल. क्षुल्लक मानसिक समस्या जाणवू शकतात. संयमाने परिस्थिती हाताळा.

धनू:- तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. मानसिक शांतता लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मदत करताना ऊर्जा वाया घालवू नका. टीकेकडे लक्ष देऊ नका.

मकर:- व्यापारासाठी योग्य काळ. कामाचा उरक वाढेल. व्यापारी वर्ग खुश राहील. अधिकारी तुमचे कौतुक करतील. दिनक्रम व्यस्त राहील.

कुंभ:- नवीन गोष्टी शिकाल. भावनेला आवर घालावी. भावंडांची बाजू समजून घ्यावी. गोष्ट अधिक प्रमाणात ताणू नये. मनाचा आवाज ऐकावा.

मीन:- घाईघाईने निर्णय घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता. योग्य जागी गुंतवणूक कराल. शेअर्स मध्ये लाभ संभवतो. कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर