scorecardresearch

Swapna Shastra : अशी स्वप्ने देतात संपत्तीची सूचना, जाणून घ्या काय सांगतं स्वप्न शास्त्र

प्रत्येक व्यक्तीला काही ना काही स्वप्न पडतात. काही स्वप्ने भीतीदायक असतात आणि काही आनंदाची असतात. स्वप्नातून जागं झाल्यावर आपण त्याचा विचार करू लागतो. खरंच असं झालं तर काय होईल? असे प्रश्न मनात घर करून राहतात.

Dream
Swapna Shastra : अशी स्वप्ने देतात संपत्तीची सूचना, जाणून घ्या काय सांगतं स्वप्न शास्त्र

प्रत्येक व्यक्तीला काही ना काही स्वप्न पडतात. काही स्वप्ने भीतीदायक असतात आणि काही आनंदाची असतात. स्वप्नातून जागं झाल्यावर आपण त्याचा विचार करू लागतो. खरंच असं झालं तर काय होईल? असे प्रश्न मनात घर करून राहतात. असं असलं तरी तुम्ही पाहिलेलं स्वप्न भविष्याचा सूचना देत असतात, असं स्वप्न शास्त्र सांगतं. वास्तविक जीवनात प्रत्येक स्वप्नाचा परिणाम वेगळा असतो. काही स्वप्न अशी असतात की, धनाच्या आगमनाचे संकेत देतात. जाणून घेऊया या स्वप्नांबद्दल…

  • स्वप्नात देव किंवा मंदिर दिसणे: स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात देव आणि मंदिर दिसणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही भविष्यात पैसे मिळणार आहे, असे संकेत असतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामात उत्तम यश मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. धनाची देवता कुबेर तुमच्यावर कृपा करणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.
  • स्वप्नात घोड्यावर स्वार होणे: स्वप्नात घोड्यावर स्वार होताना पाहणे हे देखील लाभाचे संकेत आहेत. याशिवाय हे स्वप्न नवीन काम मिळण्याचे संकेत देते. स्वप्नात हत्ती पाहणे देखील शुभ मानले जाते.तुम्हाला काही स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात किंवा तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते, असा त्याचा अर्थ होतो.
  • डाळिंब खाताना, धान्य दिसणे: स्वप्नात डाळिंब खाताना दिसले तर पैसे मिळतात. स्वप्नात अक्रोड खाणे किंवा वाटणे दोन्ही शुभ आहे. हे स्वप्न आर्थिक स्थिती सुधारण्याचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे स्वप्नात स्वतःला दही किंवा सुपारी खाताना पाहणे भविष्यात काही कामात यश दर्शवते. स्वप्नात धान्याचा ढीग पाहणे देखील शुभ असते.

Guru Uday: २३ मार्चपासून ‘या’ तीन राशींवर असेल गुरू बृहस्पतींची कृपा, जाणून घ्या

  • स्वप्नात पैशाचे व्यवहार पाहणे: जर तुम्ही तुमच्या स्वप्नात स्वतःला पैशाचे व्यवहार करताना पाहिलं तर याचा अर्थ असा आहे की येत्या काही दिवसात तुम्हाला पैसे मिळणार आहेत. स्वप्नात शेतकरी दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण आहे. यासोबतच स्वप्नात आजूबाजूला हिरवळ दिसणे हे देखील लक्ष्मी येण्याचे प्रतीक आहे. यासोबतच मुलाच्या बाजूने काही शुभ माहिती मिळू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2022 at 12:04 IST