Correct Direction of Washing Machine: वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या पाळल्यास घरात सुखसमृद्धी येऊ शकते. त्यामुळेच अशा परिस्थितीत वास्तूनुसार घराच्या कोणत्या दिशेला कोणत्या वस्तू ठेवाव्यात याचे काही नियम आहेत. चुकीच्या दिशेने ठेवलेल्या गोष्टी जीवनात भूकंप घडवून आणू शकतात. आपण अनेकदा घर सजवताना किंवा गोष्टी ठेवताना त्या कोणत्या दिशेला आहेत याकडे फारसे लक्ष देत नाही. पण काही वस्तू अशा आहेत, ज्या चुकीच्या दिशेला ठेवल्यास त्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. त्यामध्ये वॉशिंग मशीनचादेखील समावेश होतो. वॉशिंग मशीन जरी घरगुती उपकरण असले तरी त्याची दिशा चुकीची असेल, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

आजकाल बहुतेक घरांमध्ये कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्याने वेळेची पुरेपूर बचत होते. त्याशिवाय या मशीनचा वापर करताना मेहनतही जास्त प्रमाणात लागत नाही. त्यामुळे सध्याच्या धावपळीच्या या जगात वॉशिंग मशीन ही आज सर्व लोकांची आवश्यक गरज बनली आहे. परंतु, वास्तूनुसार जर तुम्ही घरात वॉशिंग मशीन ठेवत असाल, तर त्यासाठी कोणती दिशा उत्तम आहे ते जाणून घ्या. घरात वॉशिंग मशीन ठेवण्याची योग्य जागा कोणती? वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे. घरात वॉशिंग मशीन योग्य दिशेला ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. वॉशिंग मशीन चुकीच्या दिशेला ठेवल्यास अनेक समस्या येऊ शकतात.

वॉशिंग मशीनसाठी ‘या’ दोन दिशा अयोग्य

वास्तुशास्त्रानुसार वॉशिंग मशीन कधीही दक्षिण-पूर्व दिशा (आग्नेय कोन) आणि उत्तर दिशा या ठिकाणी ठेवू नये.

दक्षिण-पूर्व दिशेला वॉशिंग मशीन ठेवल्यास उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढतो, आर्थिक अस्थिरता येते आणि सरकारी योजनांमध्ये केलेली गुंतवणूक बुडण्याचा धोका असतो.

उत्तर दिशेला मशीन ठेवल्यास नवीन संधींचा अभाव निर्माण होतो, प्रगती थांबते आणि मानसिक तणाव, आर्थिक तंगी व आजारपण यांचा सामना करावा लागू शकतो.

इतर कोणत्याही दिशेच्या वापराने होणारा फायदा…

वास्तुतज्ज्ञांच्या मते, वरील दोन दिशा वगळता तुम्ही वॉशिंग मशीन इतर कोणत्याही दिशेला ठेवू शकता. जर असे केले, तर घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि आर्थिक समस्या दूर होऊ लागतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)