एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील संघर्ष आता वाढत चालला आहे. शिंदे गटाकडून दादर मध्यवर्ती कार्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. आज मानखुर्द येथे शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटनदेखील करण्यात आले आहे. असे असताना आता मुंबईनंतर औरंगाबाद शहरातही असेच एक कार्यालय उभारण्यात येणार असून साठी शिंदे गटाकडून जागेचा शोध घेतला जात आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

हेही वाचा >>> नवाब मलिकांनी केलेल्या ‘त्या’ आरोपाप्रकरणी समीर वानखेडेंना क्लीनचिट; जन्माने मुस्लीम नसल्याचा निष्कर्ष

दादरनंतर औरंगाबाद शहरातही शिंदे गटाकडून एखा कार्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. तशी घोषणा शिंदे गटातील औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केली आहे. यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे. जागा मिळाली की येथे लवकरच कार्यालय उभारले जाणार तसेच येथे शाखेचेही उद्घाटन केले जाणार, असे जंजाळ यांनी सांगितले आहे. मुंबईनंतर औरंगाबाद शहरावर शिवसेनेची पकड आहे. मागील कित्येक वर्षांपासून या दोन्ही महापालिकांवर शिवसेनेची सत्ता आहे. असे असताना आगामी पालिका निवडणूक आणि पक्षबांधणी लक्षात घेता, शिंदे गटाने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>> Sonia Gandhi Covid Positive: सोनिया गांधी करोना पॉझिटिव्ह; दोन महिन्यात दुसऱ्यांदा झाली लागण

मुंबईमध्ये मध्यवर्ती कार्यालयाची केली जाणार स्थापना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दादरमध्ये शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. मुंबईच्या प्रत्येक प्रभागामध्ये अशी कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. येत्या १५ दिवसांमध्ये या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असून मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे गटातील सदा सरवणकर यांनी सांगितले होते.