छत्रपती संभाजीनगर : गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात बुधवारी सायंकाळी वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून तीन महिलांचा मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. मृतांमध्ये सासू-सुनेचा समावेश आहे.

हेही वाचा : जायकवाडीवर ड्रोनद्वारे टेहळणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शालनबाई शेषराव नजन (वय ६५), त्यांची सून लंका हरिभाऊ नजन (वय ४०) व विजूबाई बाळासाहेब खेडकर (वय ४१), अशी मृत महिलांची नावे आहेत. तर यमुना माणिक खेडकर (वय ६५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी व मृत महिला बुधवारी दिवसभर शेतात काम करत होत्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यातच तिन्ही महिला थांबलेल्या ठिकाणी वीज कोसळली. यात तिघींचाही मृत्यू झाला. मृत महिला या चकलांबा येथील रहिवासी आहे. त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असता त्यांना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर यमुना खेडकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.