छत्रपती संभाजीनगर – रास्त दुकानदारावर कारवाई व परवानाही रद्द न करण्यासाठी केज तहसील कार्यालयातील तहसीलदार व कोतवाल २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळयात अडकले. अभिजीत लक्ष्मण जगताप व मच्छिंद्र मारोती माने, अशी लाच मागणाऱ्यांची नावे असून दोघे केज तहसील कार्यालयात अनुक्रमे तहसीलदार व कोतवाल पदी आहेत.  तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची मागणी करून २० हजार स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले.

हेही वाचा >>> शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

Kalyan, Anti-corruption department, filed case, police, bribe
सात लाखाची लाच मागणाऱ्या कल्याणमधील पोलिसावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा
Organ Transplant Racket
दिल्लीत अवयव प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश! एका डॉक्टरसह ७ जणांना अटक, मुख्य सूत्रधार बांगलादेशी
Hathras Stampede
Hathras Stampede : मृतदेहांचा खच पाहून हृदयविकाराचा धक्का, ड्युटीवर तैनात पोलिसाचा जागीच मृत्यू
Medha Patkar Indefinite Hunger Strike,
अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत! बॅकवॉटर लेव्हल्सचा मुद्दा काय आहे?
nashik, trimbakeshwar, Bribery Scandal in nashik, Land Records Office Multiple Officials Caught Red Handed in bribery case, nashik Land Records Office official caught in bribe case, Corruption,
नाशिक : ‘भूमी अभिलेख’चा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, ३५ हजारांची लाच घेताना प्रभारी भूकरमापक जाळ्यात
Action on fake Kunbi certificates All party meeting to decide on issues of OBC
खोट्या कुणबी प्रमाणपत्रांवर कारवाई; ओबीसींच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
The next hearing of the court case regarding the selection list for RTE admission will be held in July pune
आरटीई प्रवेश आणखी लांबणीवर… पालकांचा जीव टांगणीला…
panchaganga river pollution
पंचगंगेच्या प्रदुषणाचा प्रश्‍न सुटणार; ‘सीईटीपी’च्या ५३१ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता – प्रकाश आवाडे

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांचे रास्तभाव धान्य दुकान असून, त्यांचे रास्त भाव धान्य दुकानामध्ये शासनाकडून मिळालेला धान्यसाठा व तक्रारदार यांनी ग्राहकांना वाटप केलेले धान्य यामध्ये तफावत असल्याचे सांगून तक्रारदार यांचेवर कारवाई न करण्याकरीता तसेच त्यांचा रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द न करण्याकरीता तहसिलदार अभिजीत जगताप याने कोतवाल मच्छिंद्र माने याचे मार्फतीने तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदार यांच्यासमक्ष ४० हजार रुपये लाच मागणी करुन प्रोत्साहन दिले. तसेच माने याने तडजोडी अंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन पंच साक्षीदारा समक्ष तक्रारदार यांचेकडुन लाच रक्कम स्वीकारले. मच्छिंद्र माने यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे व त्यांच्या सापळा पथकातील पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे यांनी केली.