देशातील आघाडीची टू-व्हिलर निर्माता कंपनी Hero MotoCorp ने अलीकडेच आपली बहुचर्चित-बहुप्रतिक्षित सर्वात शक्तिशाली आणि सर्वात महागडी मोटरसायकल Mavrick 440 लाँच केली आहे. Harley Davidson X440 प्रमाणे, ही Hero बाईक ४४०cc सिंगल-सिलेंडर, BS-6, E20 ऑइल-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे, जी ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. हे इंजिन २७ bhp चा पॉवर आऊटपुट आणि जास्तीत जास्त ३८ NM टॉर्क जनरेट करते.

Hero MotoCorp आणि Harley-Davidson यांनी संयुक्तपणे विकसित केलेली Mavrick 440 मिडलवेट बाईक हिरो मोटोकॉर्पच्या राजस्थानमधील नीमराना प्लांटमधून तयार केली जात आहे. हिरोची ही बाईक आकर्षक डिझाइनमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीने ५,००० रुपयांमध्ये Maverick 440 बाईक बुकींग करता येईल, असं सांगितलं आहे. तुम्ही  Hero MotoCorp च्या अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या डीलरशिपला भेट देऊन बाईक बुक करु शकता. 

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा

बाईक कशी आहे खास?

या प्रीमियम बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कनेक्टेड फीचर्स, स्मार्टफोन इंटिग्रेशन, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारख्या अनेक फीचर्स देण्यात आल्या आहेत. बाईकमध्ये एलईडीमध्ये फुल एलईडी हेडलाइट, एलईडी डीआरएल आणि टर्न इंडिकेटरही देण्यात आले आहेत. बाईकमध्ये ४३mm टेलिस्कोपिक फोर्क देण्यात आला आहे, शिवाय बाईकचा ३२०mm फ्रंट आणि २४०mm रिअर डिस्क ब्रेक आहे. 

(हे ही वाचा : ६.६६ लाखाच्या मारुतीच्या ‘या’ ६ एअरबॅग्स असलेल्या कारसमोर सर्व पडतात फिक्या? १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ३० किमी )

बाईकची किंमत किती?

कंपनीने ही बाईक १.९९ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत सादर केली आहे. Hero MotoCorp ने १५ एप्रिल २०२४ पासून या बाईकची डिलिव्हरी सुरू करण्याची घोषणा केली आहे.

जर आपण स्पर्धेवर नजर टाकली तर ही बाईक बाजारपेठेत Harley Davidson X440, KTM 390 Duke, Honda CB 350, Royal Enfield Bullet, Classic 350, Triumph Scrambler, Speed ​​400 या बाईकशी स्पर्धा करते.