News Flash

भविष्य : दि. १८ ते २४ मे २०१८

व्यापार-उद्योगात एखादा नवीन आणि मोठा प्रोजेक्ट हातात घ्याल.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष इच्छा तेथे मार्ग आहे हे कृतीने सिद्ध कराल. त्याचे फायदे तुम्हाला मिळतील. व्यापार-उद्योगात एखादा नवीन आणि मोठा प्रोजेक्ट हातात घ्याल. नवीन तंत्रज्ञान मिळवण्याकरिता परदेशवारी करतील. नोकरदार व्यक्ती विविध प्रकारची कामे हाताळतील. त्यांचे बदलीचे/कामातील बदलाचे रूपाने साकार होईल. नवीन जागेमध्ये स्थलांतर होण्याचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.

वृषभ तुम्हाला काम करण्याची खूप इच्छा असेल, पण सभोवतालच्या वातावरणाची साथ नसल्यामुळे तुम्ही कोडय़ात पडाल. अशा वेळी हरून न जाता कंबर कसून तयार व्हा म्हणजे सर्व काही ठीक होईल. व्यापार-उद्योगात नवीन काम स्वीकारण्यापूर्वी हातातील कामे वेळेत पूर्ण करा. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या गुणांचा फायदा उठवतील. किरकोळ कारणावरून नातेवाईक, आप्तेष्ट यांचे बिनसायला वेळ लागणार नाही.

मिथुन नेहमीची माणसे आसपास असतील तरी तुम्हाला चुकल्याचुकल्यासारखे वाटेल. अशा परिस्थितीत काम करायला लागल्यामुळे मनावर एक प्रकारचा दबाव राहील. व्यापार-उद्योगात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा र्सवकष विचार करा.  नोकरीमध्ये जादा कामानिमित्ताने एखादी विशेष सवलत मिळेल; पण त्यामुळे तुमची दगदग, धावपळ वाढेल. घरामध्ये इतरांच्या बोलण्याचा गरसमज करून घेऊ नका.

कर्क ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून आहात त्या व्यक्ती आयत्या वेळेला नकारघंटा वाजवतील. पण तुम्ही त्यांच्याकरिता अडून न राहता ठरविलेली कामे ठरवलेल्या वेळात पार पाडाल. व्यापार-उद्योगात सरकारी कामे आणि कोर्टव्यवहार यांना चालना मिळाल्याने काही गोष्टी मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी विशिष्ट कामगिरीकरता तुम्हाला जादा अधिकार दिले जातील. बेकार व्यक्तींना रोजंदारी मिळेल.

सिंह ग्रहमान तुमची इच्छापूर्ती करणारे आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे कसे आहोत हे दाखवण्याची तुम्हाला संधी मिळेल. व्यापार-उद्योगात चालू कामाव्यतिरिक्त एखादे नवीन काम स्वीकारा. देशात किंवा परदेशात प्रवास करून तेथे नवीन शाखा उघडावीशी वाटेल. नोकरीमध्ये तुम्हाला जादा अधिकार मिळाल्यामुळे वागण्याबोलण्यात एक प्रकारचा रुबाब दिसेल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये एखादे मंगलकार्य ठरेल.

कन्या ग्रह तुम्हाला लाभदायक होतील. ज्या कामाकरिता तुम्ही बरेच प्रयत्न करत होता ते काम नजरेच्या टप्प्यात येईल. व्यापार-उद्योगात कामाचा व्याप वाढेल. कारखानदार मंडळी देशात किंवा परदेशात नवी शाखा उघडतील. नोकरीमध्ये पूर्वी केलेल्या कामाचा उपयोग झाल्यामुळे तुमच्या कामाचा भार हलका होईल. काही जणांना कंपनीमार्फत नवीन प्रशिक्षण दिले जाईल. घरामध्ये पूर्वी ठरलेले शुभकार्य पार पडेल.

तूळ ग्रहमान सुधारत असल्यामुळे तुमच्या इच्छाआकांक्षा आता वाढणार आहेत. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार न करता जी गोष्ट आपल्या मनाला पटलेली आहे ती करण्यावर तुमचा भर असेल. व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने उपयोगी हितसंबंध निर्माण होतील. नोकरीमध्ये वरिष्ठांनी दिलेले आश्वासन पूर्ण होण्याची खात्री वाटेल, नवीन कामाच्या निमित्ताने काही जणांना परदेशी जाता येईल. घरामध्ये नातेवाईकांची हजेरी लागेल.

वृश्चिक उडत्या पाखराचे पंख मोजणारी तुमची रास आहे. त्यामुळे सहसा तुमचे अंदाज आडाखे चुकत नाहीत. या आठवडय़ात तुम्हाला या गुणाचा उपयोग होईल. जी कामे लांबलेली होती ती हातावेगळी करण्याचा या आठवडय़ात तुम्ही निश्चय कराल. व्यापार-उद्योगात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळेल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी गोड बोलून तुम्ही तुमचा मतलब साध्य करू शकाल.

धनू आठवडय़ाच्या सुरुवातीला आपण काम करू की नाही अशी शंका तुमच्या मनात असेल. तुम्ही भरपूर काम करू शकाल. व्यापार-उद्योगात स्वत काम करण्यापेक्षा हाताखालच्या व्यक्तींकडून तुम्ही काम करून घ्याल. नोकरीच्या ठिकाणी एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर अशी तुमची स्थिती असेल. वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव मिळेल. घरामधे पूर्वी ठरलेला कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे.

मकर एखादी गोष्ट कशा प्रकारे घडेल यासंबंधी तुमचे काही अंदाज असतात त्याप्रमाणे तुम्ही कामाची आखणी करून ठेवता त्याचा तुम्हाला उपयोग होतो. या आठवडय़ात तुमचे नियोजन तुमच्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ एखादे किचकट काम सांगून त्यांची परीक्षा बघतील. त्यामध्ये खूप कष्ट असतील. घरामध्ये तुमचे अंदाज-आडाखे बरोबर ठरल्यामुळे तुमची स्तुती तुम्हाला ऐकायला मिळेल.

कुंभ या आठवडय़ामध्ये तुम्हाला खूप काम करायचे आहे. त्यासाठी प्रकृतीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.  व्यापार-उद्योगात पसे मिळवण्याकरिता कुवतीबाहेर जाऊन धोका पत्करू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खूश ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या तत्त्वांशी तडजोड करावी लागेल. तुमच्या संस्थेविषयी मतप्रदर्शन शक्यतो करू नका. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तींशी प्रेमाने वागा वातावरण शांत राहील.

मीन सध्याच्या जगात पशाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे इच्छा असो वा नसो त्या कामाला प्राधान्य द्यावेच लागेल.  व्यापार-उद्योगात एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. या आठवडय़ात नवी आणि जुनी अशी दोन्ही कामे करावी लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. घरामध्ये जो माणूस काम करतो त्याच्याच मागे काम लागते असा अनुभव येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 1:01 am

Web Title: astrology 18th to 24th may 2018
Next Stories
1 भविष्य : दि. ११ ते १७ मे २०१८
2 भविष्य : दि. ४ ते १० मे २०१८
3 भविष्य : दि. २७ एप्रिल ते ३ मे २०१८
Just Now!
X