मागणीच्या परिस्थितीत होत असलेली सुधारणा, नवीन व्यवसायातील मोठी वाढ आणि रोजगार निर्मितीच्या आघाडीवर सुधारलेले चित्र असूनही भारताच्या सेवा क्षेत्राच्या सक्रियतेत सरलेल्या जूनमध्ये घट दिसून आली, असे मासिक सर्वेक्षणातून बुधवारी पुढे आले. सेवा क्षेत्राच्या वाढीने तीन महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक जून महिन्यात ५८.५ गुणांवर नोंदला गेला. मे महिन्यात तो ६१.२ गुणांवर होता. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये निर्देशांकात घसरण झाली असली तरी त्यातील वाढीचा कल मात्र कायम राहिला आहे. सलग २३ व्या महिन्यात सेवा क्षेत्रात सकारात्मक वाढ नोंदविण्यात आली आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५० गुणांच्या खाली आकुंचनाचा निदर्शक मानला जातो.

हेही वाचाः Money Mantra : पोस्ट ऑफिस आरडीवर आता मिळणार अधिक व्याज; २०००, ३०००, ४००० आणि ५००० रुपयांच्या आरडीवर किती फायदा?

नवीन व्यवसायातील वृद्धी, मागणीत होत असलेली वाढ आणि विपणन मोहिमा यामुळे सेवा क्षेत्राची सक्रियता वाढत असल्याचे निरीक्षण सर्वेक्षणातील सदस्यांनी नोंदविले आहे. याबाबत एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा म्हणाल्या की, किमतीच्या बाबतीत संमिश्र चित्र दिसून येत आहे. उत्पादन खर्चामध्ये सरासरीपेक्षा कमी वेगाने वाढ होत आहे मात्र, सेवा उत्पादनांची महागाई सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. खासगी क्षेत्रातील उत्पादनांचा विचार करता त्यांच्या किमती मागील दशकभरातील सर्वाधिक वेगाने वाढल्या आहेत.

हेही वाचाः RBI ने स्मॉल फायनान्स बँक उघडण्यासाठी आलेले ३ अर्ज केले रद्द; पण कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय सेवा क्षेत्राची वाढ जून महिन्यात कामय राहिली आहे. नवीन व्यवसायातील वाढीसह इतर सर्वच पातळ्यांवर सुधारणा झाल्याचे दिसत आहे. यामुळे रोजगारांमध्येही वाढ झाली आहे. नजीकच्या काळात ही वाढ कायम राहील, असंही एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी सांगितलंय.