पीटीआय, दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली कॅनरा बँक समभाग विभागणीची (स्प्लिट) योजना आखत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या २६ फेब्रुवारीच्या नियोजित बैठकीत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव चर्चेला घेतला जाणार आहे. भांडवली बाजारात समभागांची तरलता वाढवण्यासाठी बँकेकडून हे पाऊल उचलले जाणार आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
रिझर्व्ह बँक, इतर नियामक आणि भारत सरकारच्या पूर्व-परवानगीच्या अधीन राहून, बँकेच्या समभागांच्या विभाजनासाठी संचालक मंडळाकडून तत्त्वत: मान्यता घेणे हा या बैठकीचा अजेंडा आहे. मुंबई शेअर बाजारात कॅनरा बँकेचा समभाग ५.८९ टक्क्यांनी म्हणजेच ३०.७० रुपयांनी वधारून ५५२.१५ रुपयांवर बंद झाला.