केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज काय ड्रीम अर्थसंकल्प सादर करणार, कोणत्या क्षेत्रात भरीव तरतूद करतात, कोणत्या नव्या लोकप्रिय घोषणा करतात अशा अनेक अर्थांनी या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे सकाळी शेअर बाजारातील उलाढाल सुरु होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (Sensex) वाढ बघायला मिळाली. तर निफ्टीने (Nifty) ने ही सुरुवातीपासून तेजी दाखवायला सुरुवात केली होती.

Sensex ने काही वेळेत साठ हजारांचा टप्पा ओलांडला तर Nifty ने देखील १७ हजार ८०० चा टप्पा पार केला. विशेषतः अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला तेव्हा तर Sensex च्या निर्देशांकात सकाळच्या तुलनेत एक हजाराची भर पडली होती. Sensex ने ६० हजार ७७० चा उच्चांक तर Nifty ने १७ हजार ९०० चा टप्पा गाठला होता.

हेही वाचा… Video: कसा आहे केंद्रीय अर्थसंकल्प? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र संपूर्ण अर्थसंकल्प मांडला गेल्यावर त्याचे विश्लेषण जसे सुरु झाले, जशा संमित्र प्रतिक्रिया या अर्थसंकल्पाबाबत यायला लागल्या तसा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आणि Nifty मध्ये घसरणीला सुरुवात झाली. दिवसाअखेर BSE Sensex मध्ये १६२ वाढ होत ५९ हजार ७१२ वर बंद झाला तर Nifty हा ४६ अंकांनी घसरत १७ हजार ६१६ वर स्थिरावला.

हेही वाचा… Budget 2023 : मोदींची पहिली प्रतिक्रिया “मध्यमवर्गाला सक्षम बनवणारा अर्थसंकल्प”; म्हणाले “प्राप्तिकर रचना अधिक…

प्रामुख्याने ITC, TATASTEEL, ICICIBANK, TCS, HDFCBANK, HDFC, KOTAKBANK, WIPRO यांच्या शेयरमध्ये वृद्धी झाली तर प्रामुख्याने BAJAJFINSV, SBIN, INDUSINDBK, M&M, SUNPHARMA, AXISBANK, MARUTI, TITAN यांच्या शेअरमध्ये घसरण झालेली बघायला मिळाली.