प्रश्नवेध एमपीएससी  : रोहिणी शहा

वनसेवा मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर रोजी होत आहे. या परीक्षेच्या पेपर एकसाठी सराव प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

प्रश्न १ – बँकांचे विलीनीकरण करण्याची शिफारस रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया शासनास करते. अशी शिफारस कोणत्या कारणाने करता येते?

१) संबंधित बँकांनी विनंती केल्यास

२) एखादी बँक आजारी / अक्षम बनल्यास

३) गरव्यवस्थापनामुळे बँकेची स्थिती खालावल्यास

४) वरील सर्व

प्रश्न २ – भारतामध्ये कृषी उत्पादनांची किमान आधारभूत किंमत कोण ठरवते?

१) कृषी मूल्य आयोग

२) केंद्रीय कृषी मंत्रालय

३) वखार महामंडळ

४) केंद्रीय मंत्रालय

 प्रश्न ३ – चलनवाढीच्या काळात पुढीलपकी कोणता परिणाम दिसून येत नाही?

१) चलनाच्या खरेदीशक्तीत घट

२) किंमतवाढ

३) चलनाची खरेदीशक्ती व महागाई दोन्हीमध्ये वाढ

४) बाजारातील तरलतेत वाढ

प्रश्न ४ -अयोग्य विधान कोणते?

१) भारतीय चलनामध्ये नाणी, नोटा व सरकारी रोख्यांचा समावेश होतो.

२) देशातील चलनी नाणी भारत सरकार तयार करते.

३) देशातील सर्व चलनी नोटा रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया छापते.

४) देशातील सर्व नाणी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया चलनात आणते.

 प्रश्न ५ – पुढीलपकी कोणास मतदानाचा हक्क नाही?

अ. मनोरुग्ण

ब. दिवाळखोर

क. १८ वर्षांखालील भारतीय नागरिक

ड. संबंधित मतदारसंघाचा रहिवासी नसलेला नागरिक

पर्याय

१) केवळ अ आणि ब

२) केवळ क आणि ड

३) केवळ क

४) वरील सर्व

प्रश्न ६ – शेती व पशुपालन व्यवसायाचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करणे हे नीतिनिर्देशक तत्त्व कोणत्या कलमान्वये विहित केले आहे?

१) कलम ४६

२) कलम ४७

३) कलम ४८

४) कलम ४९

 प्रश्न ७ – पुढीलपकी कोणती नदी /नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात?

अ. तुंगभद्रा     ब. कावेरी       क. गोदावरी              ड. नर्मदा                  इ. कृष्णा

१) अ, ब आणि क

२) ब, क आणि ड

३) क आणि ड

४) ब आणि इ

 प्रश्न ८ – पुढीलपकी कोणते विधान अयोग्य आहे?

१) बिहार हे भारतातील सर्वाधिक पूरप्रवण राज्य आहे.

२) पाकची सामुद्रधुनी कच्छ्चे आखात आणि खंबातचे आखात यांच्या दरम्यान आहे.

३) तंबाखूचा कपूरी वाण हा आंध्र प्रदेशामध्ये आढळतो.

४) भारतातील सर्वाधिक ताग गिरण्या पश्चिम बंगालमध्ये आहेत.

 प्रश्न ९ – पुढीलपकी कोणती घटना दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान घडली?

१) क्रिप्स मिशनची भारतभेट

२) कॅबिनेट मिशनची भारतभेट

३) मुंबईमध्ये नाविकांचे बंड

४) सायमन कमिशनची भारतभेट

प्रश्न १० – पुढीलपकी कोणता १८५७ च्या राष्ट्रीय उठावाचा परिणाम नाही?

१) भारतामधील लष्करामध्ये ब्रिटिश शिपायांचे प्रमाण वाढवण्यात आले.

२) राणी व्हिक्टोरियाने भारताची सम्राज्ञी हा किताब धारण केला.

३) भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपविण्यात आला.

४) भारतविषयक मुद्दे हाताळण्यासाठी भारतमंत्री हे पद ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निर्माण करण्यात आले.

उत्तरे व स्पष्टीकरणे

प्र. क्र. १) – योग्य पर्याय (४)

प्र. क्र. २) – योग्य पर्याय (१)

प्र. क्र. 3) – योग्य पर्याय (३)

प्र.क्र. ४) – योग्य पर्याय

(१) भारतीय चलनामध्ये फक्त नाणी व नोटांचा समावेश होतो. पूर्वी एक रुपयांच्या नोटा भारत सरकार छापत असे व आरबीआय चलनात आणत असे. मात्र आता १ व २ रुपयांच्या नोटा छापणे बंद झाले असून जुन्या नोटा चलनात आहेत.

प्र.क्र.५) – योग्य पर्याय (४) (न्यायालयाने मनोरुग्ण घोषित केलेली व्यक्ती, दिवाळखोरी जाहीर केलेली व्यक्ती मतदार म्हणून नोंदणी होण्यास अपात्र असते. तर एका मतदारसंघात नोंदणी झालेला मतदार दुसऱ्या मतदारसंघात मतदान करू शकत नाही. ६१व्या घटनादुरुस्तीने मतदानासाठी किमान वय २१ वर्षांवरून १८ वर्षांवर आणले.)

प्र.क्र.६) – योग्य पर्याय (३) कलम ४८अन्वये दुभती जनावरे आणि गायींच्या प्रजातींचे वाण सुधारणे तसेच त्यांच्या कत्तलीस आळा घालणे या तरतुदीही करण्यात आल्या आहेत.

प्र.क्र.७) – योग्य पर्याय (४) तुंगभद्रा नदी पूर्ववाहिनी असली तरी ती कृष्णा नदीमध्ये मिळते. कृष्णा नदी बंगालच्या उपसागरास मिळते.

प्र.क्र.८) – योग्य पर्याय (२) पाकची सामुद्रधुनी मन्नारचे आखात आणि बंगालचा उपसागर यांच्या दरम्यान आहे.

प्र.क्र.९) – योग्य पर्याय (१) दुसरे महायुद्ध सन १९३९ ते १९४५ दरम्यान घडले. क्रिप्स मिशनची भारतभेट सन १९४२ मध्ये झाली तर सायमन कमिशन १९२७, कॅबिनेट मिशन १९४६ मध्ये भारतभेटीवर आले. तर मुंबईतील नाविकांचे बंड १९४६मध्ये घडले.

प्र.क्र.१०) – योग्य पर्याय (३) भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन ब्रिटिश सम्राज्ञीकडे सोपविण्यात आला.