एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, पुणे येथे खाली नमूद केलेल्या विषयांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत समाविष्ट विषय :
* प्रॉडक्ट डिझाइन.
* ग्राफिक डिझाइन.
* ट्रान्सफॉरमेशन डिझाइन.
* अॅनिमेशन डिझाइन.
* रिटेल अँड एक्झिबिशन डिझाइन.
* फिल्म अँड व्हिडीओ डिझाइन.
* इंटिरिअर स्पेस अॅण्ड इक्विपमेंट डिझाइन.
युनिव्हर्सिटी फॉर क्रिएटिव्ह आर्टस- इंग्लंडच्या सहकार्याने घेण्यात येणारे अभ्यासक्रम :
* फॅशन डिझाइनमधील बीए (ऑनर्स).
* फॅशन प्रमोशन अँड इमेजिंगमधील बीए ऑनर्स.
* फॅशन डिझाइनमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
* फॅशन मॅनेजमेंट अँड मार्केटिंगमधील एमबीए अभ्यासक्रम.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्जदारांनी पदवी अभ्यासक्रमासाठी बारावीची परीक्षा तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संबंधित विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
प्रवेश पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, पुणेतर्फे घेण्यात येणारी ऑल इंडिया लेव्हल डिझाइन अॅप्टिटय़ूड टेस्ट ही प्रवेशपात्रता परीक्षा, स्टुडिओ टेस्ट व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित अभ्यासक्रमाच्या २०१४-२०१५ या शैक्षणिक सत्रासाठी निवड करण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन- पुण्याच्या http://www.mitid.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व तपशीलवार प्रवेश अर्ज ३१ जानेवारी २०१४ पर्यंत पाठवावेत.
ज्या विद्यार्थ्यांना डिझाइन वा संबंधित विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल अशांसाठी हे अभ्यासक्रम फायदेशीर ठरू शकतील.