अनेक व्यक्तींना आपल्या चरितार्थासाठी नाइलाजास्तव शिक्षण सोडून नोकरी किंवा व्यवसाय करावा लागतो. नोकरी/ व्यवसाय करत असताना नियमित/ पारंपरिक शिक्षणाचे वयही निघून गेलेले असते. मात्र पुढे नोकरी किंवा व्यवसायाची निवड करताना त्याला विशिष्ट शिक्षणाची गरज भासते. अशा वेळी पारंपरिक पद्धतीचे किंवा पारंपरिक विद्यापीठांतून शिक्षण घेणे शक्य होत नाही, कारण ती पूर्ण वेळ शिक्षण पद्धती असते. अशा शिक्षणापासून वंचित असलेल्या व्यक्तींसाठी दूरशिक्षण ही एक चांगली संधी आहे. ही संधी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.
नियमित वर्गात न जाता आपली नोकरी सांभाळून आणि आपल्या सोईच्या वेळेत अभ्यास करून शिक्षण पूर्ण करता येते. या विद्यापीठाकडून प्राप्त होणारी पदवी राज्यातील कोणत्याही विद्यापीठाच्या पदवीशी समकक्ष आहे. महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने या विद्यापीठाला मान्यता दिलेली असून या विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील सेवा व पदांवरील भरतीसाठी मान्यता मिळालेली आहे.
विद्यार्थ्यांना नोकरी करता करता शिक्षण घेण्याची, घरच्या घरी अभ्यास करता येईल, अशी तज्ज्ञ लेखकांकडून लिहिलेली पुस्तके अध्ययन शुल्कातच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येतात. याशिवाय अभ्यासक्रमातील अडचणी, शंका, प्रश्न सोडविण्याकरिता अभ्यास केंद्रावर तज्ज्ञ मार्गदर्शक-प्राध्यापकांचे मार्गदर्शन, बारावी उत्तीर्ण नसणाऱ्यांनादेखील पूर्वतयारी शिक्षणक्रम पूर्ण करून पदवी मिळविण्याची संधी, काही कारणाने पुढील शिक्षणात खंड पडला असेल त्यांनाही उच्च शिक्षण घेण्याची संधी देऊन विकासाच्या वाटा मोकळ्या करण्यासाठी प्रयत्न, आवडीप्रमाणे अभ्यासक्रमांची निवड आणि सवडीप्रमाणे अभ्यास करण्याची संधी, ठरावीक कालावधीत शिक्षणक्रम पूर्ण करण्याचे बंधन नाही. बी.ए./ बी.कॉम. पदवी, अधिष्ठान, ऐच्छिक, उपयोजित अशा तीन अभ्यासक्रमांचा समावेश, राज्यातील इतर विद्यापीठांच्या पदवीशी मुक्त विद्यापीठाच्या पदवीची समकक्षता, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी मुक्त विद्यापीठाचा पदवीधर पात्र, अभ्यास केंद्रांवर प्रवेश घेण्याची व परीक्षा देण्याची सुविधा, त्यासाठी नाशिक येथे जाण्याची गरज नाही. अंतर्गत (वर्गचाचणी) व अंतिम परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अशी या विद्यापीठाची ठळक वैशिष्टय़े आहेत.
मुक्त विद्यापीठाने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना केंद्रिबदू मानून त्याची कार्यपद्धती ठरविलेली आहे. अत्यल्प शिक्षण शुल्कात मोठय़ा प्रमाणावर लवचीकता असलेले दर्जेदार शिक्षण देण्यावर सुरुवातीपासूनच भर दिला आहे. विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून हव्या त्या ठिकाणाहून प्रवेश आणि परीक्षा पद्धतीमुळे वेळेची आणि पशाची बचत होऊ शकते. विविध विद्याशाखांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नपत्रिका, स्वयंअध्ययन, समूहचर्चा फोरम आदी बाबींची माहिती विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac   या संकेतस्थळावर पाहता येईल.
विद्यार्थ्यांला आपल्या अभ्यासातील प्रगती वेळोवेळी तपासण्यासाठी स्वयं-अध्ययन चाचणीची सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांला हवी तेव्हा, हव्या तितक्या वेळा दिलेल्या वेळेत प्रश्न सोडविण्याची सवय लागते. यामुळे त्याला अभ्यासातील स्वत:च्या प्रगतीबरोबरच कार्यक्षमता वाढण्यासही मदत होते. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्याची शैक्षणिक प्रगती किती आहे, नेमका कोणता अभ्यास केला पाहिजे याची माहिती विद्यार्थ्यांला वेळोवेळी या माध्यमातून मिळत असल्याने त्याला अमूल्य फायदा होतो. विविध अभ्यास केंद्रांवर काही विषयांसाठी बुक बँक स्कीमही सुरू करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विद्याशाखेद्वारे स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकेल असे प्रमाणपत्र आणि पदविका शिक्षणक्रम सुरू करण्यात आले आहेत. काही शिक्षणक्रमांसाठी केवळ लिहिता वाचता येणारी कोणतीही व्यक्ती प्रवेश घेऊ शकते.
नाशिक येथे मुख्यालय असलेल्या या मुक्त विद्यापीठाने अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांना आपल्याकडचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. बारावी पास, नापास विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध अभ्यासक्रम – डिप्लोमा इन हार्डवेअर मेंटेनन्स अँड नेटवìकग टेक्नॉलॉजी, बी.ए. पत्रकारिता, बी.ए. पब्लिक सíव्हसेस, ब्युटीपार्लर व्यवस्थापन, योगशिक्षक पदविका, डिप्लोमा इन फॅशन डिझायिनग अ‍ॅण्ड बुटिक व्यवस्थापन, बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड टुरिझम स्टडीज, बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड कॅटिरग सíव्हसेस, बी.एस्सी. इन ग्राफिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमेशन अशा आकर्षक शिक्षणक्रमांनाही प्रवेश घेता येऊ शकेल. पदवी अभ्याक्रम- बी.ए., बी.कॉम. आणि बी.ए. (एमसीजे), बीबीए- इन्शुरन्स अ‍ॅण्ड बँकिंग, हॉटेल अ‍ॅण्ड टुरिझम मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट पदवी- बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टुरिझम मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटिरग ऑपरेशन्स, बॅचलर ऑफ फूड प्रोसेसिंग अ‍ॅण्ड प्रेझेंटेशन तसेच विविध अभियांत्रिकी ट्रेडचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी ‘संवाद पत्रिका’ मासिक प्रकाशित केले जाते. विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती, लेख, सूचना यांचा त्यात समावेश असतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची प्रेरणा व दूरशिक्षणाबाबत जागरूकता वाढविण्याचे कार्य या पत्रिकेमार्फत चालते. विविध अभ्यासक्रमांची माहिती पुस्तिका संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध असून ती डाऊनलोडही करता येते. अधिक माहितीसाठी विद्यापीठ मुख्यालयात अथवा राज्यातील पुढील विभागीय केंद्रांवर, पुढील पत्ते, दूरध्वनी क्रमांक, वेबसाइटवर विद्यार्थ्यांनी संपर्क साधल्यास त्यांना आवश्यक ती माहिती मिळू शकते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, नाशिक -४२२२२२,
दूरध्वनी (०२५३)- २२३०१११, २२३००२४, २२३००२७, २२३००२८.  
विभागीय केंद्रे
० अमरावती विभाग (अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम) पत्ता- व्ही. एम. व्ही ते वलगाव रोड, पोस्ट- व्ही. एम. व्ही, अमरावती- ४४४६०४, दूरध्वनी (०७२१)-२५३१४४५.
० औरंगाबाद विभाग (औरंगाबाद, बीड, जालना) पत्ता- नंदनवन कॉलनी, छावणी, औरंगाबाद. ९४२२२४७२९३,
दूरध्वनी (०२४०) २३७१०६६.
० मुंबई विभाग (मुंबई) पत्ता- जगन्नाथ शंकरशेठ म.न.पा.ची मराठी प्राथ. शाळा, दुसरा मजला, फ्रेअर ब्रिज, (साऊथ) नाना चौक, ग्रांट रोड (प.), मुंबई- ४००००७, दूरध्वनी (०२२)-२३८७४.
० नागपूर विभाग (नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा) पत्ता- रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण बंगला, विद्यापीठ क्रीडा परिसर, लॉ कॉलेज रोड, रविनगर चौक, नागपूर- ४४०००१, दूरध्वनी (०७१२)-२५५३७२४.
० नाशिक विभाग (नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार) पत्ता- नाशिक महानगरपालिकेची जुनी इमारत, दुसरा मजला, पंडित कॉलनी, नाशिक- ४२२२२२,
दूरध्वनी- (०२५३)-२३१७०६३.
० पुणे विभाग (पुणे, सातारा) पत्ता- शाहीर अण्णा भाऊ साठे प्रशाला, महापालिका शाळा क्र. ५ (मुलांची), ६५४, सदाशिव पेठ, कुमठेकर रोड, पुणे- ४११०३०,
दूरध्वनी- (०२०) – २४४५७९१४.
० कोल्हापूर विभाग (कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी), पत्ता- शिवाजी विद्यापीठ परिसर, पोस्ट ऑफिसजवळ,
विद्यानगर, कोल्हापूर- ४१६००४,
दूरध्वनी- (०२३१)- २६०७०२२.
० नांदेड विभाग (नांदेड, परभणी, िहगोली, लातूर) द्वारा- स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, क्रीडा इमारत, नांदेड-४२१६०६. दूरध्वनी- (०२४६२)- २२९९४०.
० कल्याण विभाग (ठाणे, रायगड) पत्ता- कै. खासदार प्रकाश परांजपे स्पर्धात्मक परीक्षा केंद्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची इमारत, चंद्रभूषण प्लाझा, मिश्रा कंपाऊंड, सहजानंद चौक, कल्याण. (प.) – ४२१३०१,
दूरध्वनी- (०२५१)- २२०४०८६.  
० सोलापूर विभाग (सोलापूर, उस्मानाबाद)
पत्ता- द्वारा- दयानंद महाविद्यालय, सोलापूर- ४१३००२,
दूरध्वनी- (०२१७)- २३७५५११.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Andhra pradesh , G. Nirmala, Defying child marriage,10th examination topper
जी. निर्मला… हौंसलों की उडान
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा