यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेमध्ये बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ‘आधुनिक भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर भारत’ हा घटक सामान्य अध्ययन पेपर १ मधील महत्त्वाचा आहे. वस्तुत: यापूर्वीच्या अभ्यासक्रमात हा घटक १८५७ ते १९४७ पर्यंतच्या घडामोडींसह अभ्यासावा लागत असे. प्रस्तुत बदलानुसार हा घटक १८ व्या शतकाच्या मध्यापासून ते समकालीन घडामोडींपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. अर्थात, अधिक व्यापक व विस्तारित करण्यात आलेला आहे.
२०१३ मधील मुख्य परीक्षेत या घटकावर ८ प्रश्न (८० गुण) विचारण्यात आलेले होते.
प्रश्नांचे स्वरूप व अभ्यासाचे नियोजन
या वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न सर्वसामान्य स्वरूपाचे असले तरी इतिहासाच्या विशिष्ट पलूवर प्रकाश टाकणारे होते. म्हणून या घटकाचा अभ्यास अधिक नेमकेपणाने करणे अपेक्षित होते. उदा. विशिष्ट चळवळी, व्यक्ती आणि त्यांचे योगदान, घटना इत्यादी. त्याचप्रमाणे या प्रश्नांची उत्तरे वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे चिकित्सक व चर्चात्मक पद्धतीने लिहिणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी विषयाच्या विविध आयामांचा अभ्यास अधिक सखोलपणे तसेच विश्लेषणात्मक आकलनाद्वारे करणे उपयुक्त ठरणारे होते.
२०१३ च्या मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे व्यवस्थित विश्लेषण केल्यास या घटकाची व्याप्ती व त्यावर विचारले जाणारे संभाव्य प्रश्न या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करता येते. अभ्यासाच्या दृष्टीने या घटकाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येऊ शकते.
१. १७५७ ते १८५७ (कंपनी शासन)
२. १८५८ ते १९४७ (ब्रिटिश राजपदाचे शासन)
३. स्वातंत्र्योत्तर कालखंड (१९४७ पासून पुढील)
अभ्यासक्रमातील विविध घटकांची व प्रकरणांची उपरोक्त प्रश्नांच्या आधारे वरील वर्गीकरणाशी सांगड घालून घटकनिहाय अभ्यास करावा लागेल. या विषयाच्या विविध घटनांशी संबंधित व्यक्ती, चळवळी, कायदे व विविध गव्हर्नर जनरल, ब्रिटिशांच्या विरोधातील उठाव तसेच भारतीयांनी दिलेला स्वातंत्र्य लढा याचबरोबर स्वातंत्र्योत्तर कालखंडातील विविध घटना व त्यामागील पाश्र्वभूमी, संबंधित व्यक्ती इत्यादी बाबींचे र्सवकष पद्धतीने आकलन अत्यावश्यक ठरते. भारतीय महिलांसंबंधी विचारण्यात आलेला प्रश्न, त्याचबरोबर लॉर्ड डलहौसी, भूदान व ग्रामदान चळवळ, बांगलादेश उदयामधील भारताची भूमिका, ताश्कंद करार – वैशिष्टय़ व पाश्र्वभूमी, मौलाना अबुल कलाम आझाद इत्यादींवर विचारण्यात आलेले प्रश्न विषयाचे र्सवकष ज्ञान असल्याशिवाय सोडविता येण्यासारखे नव्हते. यामुळे संबंधित घटकांच्या अभ्यासाचे नियोजन वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक पलूंचा विचार करून केल्यास विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे अधिक स्पष्ट व नेमकेपणे लिहिता येऊ शकतात.
आधुनिक भारताचा इतिहास अर्थात १७५७ ते १९४७ या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न उदा. भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील महिलांची भूमिका, लॉर्ड डलहौसीने आधुनिक भारताचा पाया कसा रचला हे प्रश्न पारंपरिक स्वरूपाचे वाटत असले तरी त्यांची उत्तरे संबंधित व्यक्तींनी केलेल्या कार्याचा दाखला देत लिहिणे अपेक्षित होते. याचबरोबर शब्दमर्यादा व प्रश्नांची सक्ती असल्यामुळे उत्तरामध्ये अधिक नेमकेपणा असणे क्रमप्राप्त होते. या घटकाचा अभ्यास करण्यासाठी बी. एल. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ व बिपिनचंद्र लिखित ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ यासारख्या संदर्भग्रंथाच्या आधारे या घटकाचा व्यवस्थितपणे अभ्यास करता येऊ शकतो.
या वर्षी अभ्यासाच्या दृष्टीने स्वातंत्र्योत्तर कालखंड हा पूर्णपणे नवीन घटक होता. २०१३ च्या मुख्य परीक्षेत या घटकावर पाच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. अर्थात यामध्ये ताश्कंद करार, बांगलादेशचा उदय व भारताची भूमिका, जय जवान जय किसान नारा इत्यादी विशिष्ट घटनांवर अधिक जोर होता. यासाठी तत्कालीन पाश्र्वभूमी, या घटनांशी संबंधित व्यक्ती, वैशिष्टय़े याचबरोबर यशापयश, मूल्यमापन, योगदान, महत्त्व यांसारख्या आयामांवर भर देण्यात आलेला होता. ‘स्वातंत्र्योत्तर भारत’ या घटकाच्या अभ्यासाच्या दृष्टीने बिपिनचंद्र लिखित ‘इंडिया सिन्स इंडिपेंडन्स’ आणि रामचंद्र गुहा लिखित ‘इंडिया आफ्टर गांधी’ यांसारखे संदर्भग्रंथ उपयुक्त ठरतात.    
admin@theuniqueacademy.com

maldives president mohamed muizzu marathi news
विश्लेषण: मालदीवमध्ये चीनधार्जिण्या अध्यक्षांचा ‘दुसरा’ विजय… भारतासाठी हा निकाल किती महत्त्वाचा?
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?