भारतीय रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. रेल्वे भर्ती बोर्ड म्हणजेच RRB लवकरच एनटीपीसी भरती २०२२ आयोजित करणार आहे. ट्रेन क्लर्क, कनिष्ठ लिपिक, लेखा लिपिक, कम टायपिस्ट, कम टायपिस्ट, कनिष्ठ टाइम कीपर, कमर्शियल कम तिकीट क्लर्क आणि इतर रिक्त पदे या भरतीद्वारे भरली जातील.ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे त्यांनी रेल्वे भरती बोर्ड (RRB), रेल्वे भर्ती सेल (RRC) आणि इतर अधिकृत रेल्वे वेबसाइटवरील अपडेट तपासणे आवश्यक आहे. अर्ज फक्त ऑनलाइन असतील.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

ही भरती आरआरबी एनटीपीसी, कॉन्स्टेबल, आरपीएफ एसआय, आरआरबी एएलपी, ग्रुप डी पोस्ट, आरआरसी ग्रुप डी, आरआरबी पॅरामेडिकल स्टाफ, कनिष्ठ अभियंता, जेई या पदांसाठी होणार आहे.

mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
Maha Metro, Nagpur, decrease, Metro fare, 33 percent, March 1 2024,
नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर

रिक्त पदांच्या संख्येबद्दल बोलायचे झाल्यास, आरआरबी एनटीपीसी मध्ये ३००० हून अधिक पदे, ग्रुप डी साठी ६२००० पदे, आरआरबी एएलपीसाठी २६००० पदे, आरपीएफ एसआई, कॉन्स्टेबल मधील ९००० हून अधिक पदे, आरआरबी पॅरामेडिकल स्टाफसाठी १९३७ पदे, आरआरसी ग्रुप डी १०३७६९ पदे आहेत. कनिष्ठ अभियंता, जेई, सीएम, डीएमएस इत्यादीसाठी १४०३३ पदे आहेत.

( हे ही वाचा: Bank Job Alert: ‘या’ बँकेत ३७६ पदांसाठी भरती; जाणून घ्या संपूर्ण तपशील )

शैक्षणिक पात्रता काय?

शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता मागवण्यात आल्या आहेत. अनेक पदांसाठी अर्ज करण्याची प्रारंभिक पात्रता दहावी उत्तीर्ण आहे.

( हे ही वाचा: Maharashtra SSC Board Exam 2022: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी सुरू, असा करा अर्ज )

वयोमर्यादा किती?

त्याचप्रमाणे आरआरबी एनटीपीसी अर्जदारांसाठी वयोमर्यादा कमाल ३० वर्षे आहे आणि आरआरबी एएलपीसाठी वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे आहे. काही पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे आहे.

अर्ज फी

अनारक्षित आणि ओबीसी वर्गासाठी अर्ज शुल्क रु. ५००आहे. SC, ST आणि PWD साठी अर्जाची फी रु. २५० आहे.

( हे ही वाचा:Indian Army Recruitment 2021: परिक्षेशिवाय भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या संपूर्ण तपशील )

पगार किती?

परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षेचे अनेक टप्पे असतील. सर्व टप्प्यांत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचीच निवड केली जाईल. पगार १९९०० ते ३५४०० रुपये असेल.