scorecardresearch

अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठे बदल; सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या नवीन नियम

अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेत आता मोठे बदल करण्यात आले आहेत

Agniveer Indian Army
‘अग्निवीर’ भरतीसाठी आधी ‘ऑनलाईन’ प्रवेश परीक्षा(Photo : Indian Express)

भारतीय सैन्य दलात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेत आता मोठे बदल करणयात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांना आता जुनी भरतीची प्रक्रिया अवलंबता येणार नाही. शिवाय या बदललेल्या भरती प्रक्रियेमध्ये नेमके काय बदल केले आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भारतीय सैन्य दलातील (Indian Amry) भरती प्रक्रियेतील नव्या बदलानुसार आता अग्निवीर भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. या नवीन प्रक्रियेची जाहीरात भारतीय सैन्य दलाने जारी केली आहे. त्यामुळे इच्छुकांना अग्निवीर होण्यासाठी पहिल्या टप्प्यात सीईई-प्रवेश परीक्षा देणं बंधनकारक असणार आहे.

हेही वाचा- ‘या’ ७ टिप्स बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवतील, परीक्षेचा फोबिया कसा दूर करायचा ते जाणून घ्या

परीक्षा तीन टप्प्यांत –

अग्निवीर भरती प्रक्रिया आता ३ टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून यामध्ये सीईई, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी असे तीन टप्पे असतील. तर भरती प्रक्रियेचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराने भरती प्रक्रियेत बदल केला आहे. पहिल्या टप्प्यात सीईई (CEE) प्रवेश परीक्षा होईल. त्यानंतर शारीरिक चाचणी आणि शेवटच्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी (Medical Test) घेतली जाईल. याबाबतची नवीन अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे.

२०० केंद्रांवर CEE परीक्षा –

अग्निवीरच्या भरती प्रक्रियेतील नवीन बदलानुसार भरतीसाठीची सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एक तासाचा वेळ देण्यात येईल. परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जावं लागणार आहे. एप्रिल २०२३ मध्ये होणाऱ्या सीईईसाठी २०० परीक्षा केंद्र असणार आहेत. परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जारी केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची फेब्रुवारी २०२३ च्या मध्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

हेही वाचा- १० वी पास मुला-मुलींना नोकरीची मोठी संधी, BSF मध्ये १,४१० जागांसाठी मेगा भरती; अधिकची माहिती जाणून घ्या

शारीरिक चाचणी –

सीईई परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढे शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी देऊ शकतील. दुसऱ्या टप्प्यांत होणाऱ्या शारीरिक चाचणीसाठी महिला आणि पुरुष दोघांसाठीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. तर शारीरिक चाचणीत यशस्वी झालेल्या महिला पुरुष दोन्ही उमेदवार तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी पात्र ठरतील.

वैद्यकीय चाचणी –

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. यामध्ये सैन्य दलाच्या नियमांनुसार, प्रकृती आणि शारीरिक तंदुरुस्ती योग्य असल्यास उमेदवारांना अग्निवीर बनण्याची संधी मिळणार आहे.

काय होती जुनी भरती प्रक्रिया ? –

जुन्या भरती प्रक्रियेत सीईई ऐवजी पहिल्यांदा शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक होते. यानंतर वैद्यकीय चाचणी घेतली जायची आणि शेवटच्या टप्प्यात CEE परीक्षा घेतली जायची.

मराठीतील सर्व करिअर ( Career ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 11:58 IST