कृषी व्यवसाय हा जगातील सर्वात प्राचीन उद्याोगांपैकी एक आहे. ज्याची सुरुवात मानवी शेती हजारो वर्षापूर्वी झाली आहे. हे अत्यंत वैविध्यपूर्ण आहे आणि यात नवीन पिके विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञापासून ते शेती प्रक्रिया, उपकरणे, उद्याोगीक कामगार, विपणन, वितरण, विक्री या सर्वांचा समावेश होतो.

महाराष्ट्राला निसर्गाने भरपूर वरदान दिले आहे. कोकण पासून गडचिरोलीपर्यंत या निसर्ग संपन्नतेने राज्यातील कृषी क्षेत्राला एक वेगळेपण आलेले आहे. त्यामुळे ‘मातीतले करिअर’ करत असताना या निसर्गसंपन्नतेचा पुरेपूर वापर करणे आवश्यक आहे. जुन्या काळी भारत देशात शेती म्हणजे क्रमांक एक, व्यवसाय दुसऱ्या क्रमांकावर आणि नोकरी किंवा कारकुनी क्रमांक तीनवर असे महत्त्व अधोरेखित केले होते. परंतु काळानुसार यात बदल झाला. आज नोकरी प्रथम, व्यवसाय द्वितीय व शेती शेवटी असा क्रम झाला आहे.

आतापर्यंत आपण शेती क्षेत्रातील वेगवेगळ्या करिअर संधी पाहिल्या, परंतु यापुढे यातील महत्त्वाचा भाग शेती व्यवसाय आधारित करिअर बघणार आहोत. कृषी व्यवसाय म्हणजे शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायास असा होतो. कृषी व्यवसाय यामध्ये करिअर करत असताना हे सर्व व्यवसाय आपल्याला खालील विभागात वर्गीकरण करता येईल.

● पिकांचे उत्पादन आधारित व्यवसाय

● प्रक्रिया आधारित व्यवसाय

● वितरण आणि विक्री आधारित व्यवसाय

● कृषी सेवा आधारित व्यवसाय

वरील सर्व व्यवसायाचे आपण प्रत्येक लेखांमध्ये विस्तृत माहिती घेणार आहोत. कृषी व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि विकसित भारत २०४७ या केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांमध्ये याचे लक्ष दुप्पट करण्यात आले आहे.

व्यवसाय करत असताना काही अर्थशास्त्रांच्या संज्ञा आहेत. काही व्यवसायाची कौशल्य आहेत. या सर्वांचा आपण कृषी व्यवसायामध्ये वापर केला तर कृषी व्यवसाय आपणास एक चांगले करिअर घडवू शकते.

शेती व्यवसायात जास्त संधी उपलब्ध आहेत. औद्याोगिक क्षेत्र व्यवसायामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ वापरून हा अधिकचा आर्थिक लाभ घेत आहेत. परंतु ही परिस्थिती शेती क्षेत्रात वापरण्याची काळाची गरज आहे. कारण एक शेती व्यवसाय शेकडो नोकऱ्या निर्माण करू शकतो व देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावू शकतो.

कृषी पदविका तसेच पदवीधर यांनी आपले ज्ञान शेती व्यवसायात वापरले तर औद्याोगिक क्षेतत्राप्रमाणे कृषी क्षेत्र वेगाने वाढण्यास मदत होईल. तसेच प्रत्येक व्यवसायाच्या आसपास असणाऱ्या सूक्ष्म घटकांचा विकास होईल.

शेती व्यवसायामध्ये काही नवीन संधी सुद्धा निर्माण होत आहेत. यांची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. उदाहरणार्थ कृषी पर्यटन, कृषी निर्यात, कृषी सल्ला, कौशल्य विकास प्रशिक्षण, ई-कॉमर्स व्यवसाय यांचा नव्याने कृषी पदवीधर युवकांना व शेती व्यवसायात करिअर करू इच्छित युवकांनी अभ्यास करणे गरजेचे आहे.

पश्चिमात्य देशांमध्ये तेथील हवामान शेतीसाठी अतिशय प्रतिकूल आहे. मनुष्यबळ ही तेथील महत्त्वाची समस्या आहे. परंतु यावर मात करून हा देश कृषी व्यवसायामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात उलाढाल करतात.

उदाहरण द्यायचे झाले तर, इस्रायल एक छोटासा देश आहे. परंतु तेथे बेसिल पीक (तुळसवर्गीय पीक) उत्पादन होते व संपूर्ण युरोपमध्ये त्याची निर्यात केली जाते. एकट्या इस्रायलचा वाटा याच्या निर्मितीमध्ये ५० पेक्षा जास्त आहे. म्हणजे शेती व्यवसायामध्ये अभ्यासपूर्ण व शास्त्रीय पद्धतीने नियोजन केले तर महाराष्ट्रातील युवक सुद्धा क्रांती घडवू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक कृषी व्यवसाय क्षेत्रात स्पर्धात्मक राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापर वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्राहकांच्या दृष्टिकोनात बदल यासारख्या बाजारातील शक्ती आणि जागतिक हवामान बदल यासाठी नैसर्गिक शक्ती कृषी व्यवसायावर लक्षणीय सकारात्मक तसेच विपरीत परिणाम करत आहेत.
sachinhort. shinde@gmail. com