‘जॉईंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स – २०२५ (JAM 2025)’ (ऑर्गनायझिंग इन्स्टिट्यूट) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (IITD) रविवार, दि २ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेणार आहे. JAM २०२५ मधून इकॉनॉमिक्स, विज्ञानामधील उच्च शिक्षणासाठी सन २०२५-२६ करिता प्रवेश दिले जातील. २२ IITs मध्ये अंदाजे ३,००० जागांवर प्रवेश दिला जाईल. (JAM 2025 स्कोअर आधारित IISC, NITs आणि CFTIs, मध्ये CCMN मार्फत २००० प्रवेश उपलब्ध आहेत.) JAM स्कोअर पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उपयोगी पडतो – (i) M.Sc., (ii) M.Sc. Tech., (iii) M.S. (Research), (iv) M.Sc. – M.Tech. dual degree, (v) Joint M.Sc.- Ph.D (vi) M.Sc.- Ph.D dual degree

(i) एम.एस्सी. (दोन वर्षं) प्रोग्राम – आयआयटी भिलाई, भुवनेश्वर, बॉम्बे, दिल्ली, (आयएसएम) धनबाद, गांधीनगर, गुवाहाटी, हैद्राबाद, इंदौर, धारवाड, जम्मू, जोधपूर, कानपूर, खरगपूर, मद्रास, मंडी, पलाक्कड, पाटणा, रूरकी, रोपार, तिरूपती आणि (बीएच्यू) वाराणसी येथे.

Success Story of Harshit Godha left London for Avocado Farming now owns 1 crore business in Bhopal
लंडनमध्ये घेतलं बीबीएचं शिक्षण अन् सगळं सोडून धरली शेतीची वाट; वाचा वर्षाला कोटींची उलाढाल करणाऱ्या हर्षित गोधा यांची यशोगाथा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sharad Pawar Reaction on Akshay Shinde Death
Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
How to prepare for JEE Main 2025
JEE Main 2025 परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घरबसल्या अभ्यास कसा करावा?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Ahmednagar district central co operative bank
नोकरीची संधी: बँकेतील संधी
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Who killed Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update in Marathi
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम

(ii) जॉईंट एम.एस्सी. – पीएच.डी. प्रोग्राम – भुवनेश्वर, खरगपूर; एम.एस्सी. – पीएच.डी. ड्यूअल डिग्री प्रोग्राम – IIT – बॉम्बे, इंदौर, कानपूर आणि इतर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम्स २०२५-२६ साठी प्रवेश.

JAM-२०२५ स्कोअरवर आधारित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (IISc. Bangalore) मध्ये इंटिग्रेटेड पीएच.डी. प्रोग्रॅमसाठी प्रवेश.

JAM-२०२५ परीक्षा IITD, दिल्ली आयोजित करत आहे. यातून (१) केमिस्ट्री (CY), (२) बायोटेक्नॉलॉजी (BT), (३) फिजिक्स (PH), (४) मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स (MS), (५) मॅथेमॅटिक्स (MA), (६) जीऑलॉजी (GG), (७) इकॉनॉमिक्स (EN) या विषयांतील उच्च शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. अशा उमेदवारांना MHRD तर्फे आणि इतर गव्हर्नमेंट एजन्सीजकडून आर्थिक मदत दिली जाते.

JAM स्कोअर IISER (भोपाळ,पूणे) मधील प्रवेशासाठी वापरला जातो.

पात्रता : संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण. (अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

IIT इंदौर, बॉम्बे आणि रुरकी येथील एमएससी (बायोटेक्नॉलॉजी) प्रवेशासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र आहेत.

अर्जाचे शुल्क : महिला/ अजा/ अज/ अपंग यांना रु. ९००/- (एका पेपरसाठी) व रु. १,२५०/- (दोन पपर्ससाठी); इतर उमेदवारांना रु. १,८००/- एका पेपरसाठी व रु. २,५००/- दोन पेपर्ससाठी.

निवड पद्धती : JAM 2025 मध्ये ७ टेस्ट पेपर्स असतील. कालावधी – प्रत्येकी ३ तास. ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) दि.२ फेब्रुवारी २०२५ सेशन-१ साठी (सकाळचे सत्र) CY, GG, MA आणि सेशन-२ साठी (दुपारचे सत्र) BT, EN, MS, PH. एकूण ६० प्रश्न, १०० गुण. प्रत्येक पेपर ३ सेक्शन्समध्ये विभागलेला असेल. सेक्शन ‘ए’ एकूण ३० MCQ प्रश्न १० प्रश्न १ गुणांचे, २० प्रश्न २ गुणांचे. (चुकीच्या उत्तराला प्रश्नासाठी असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.) सेक्शन-बी – एकूण १० प्रश्न मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन (MSQ) एकापेक्षा अधिक उत्तरे असलेले. सेक्शन-सी – एकूण २० प्रश्न न्यूमरिकल आन्सर टाईप (NAT) प्रश्न. प्रत्येकी १० प्रश्न १ व २ गुणांसाठी सेक्शन बी व सेक्शन सी मधील चूकीच्या प्रश्नासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

उमेदवारांना ऑनलाइन व्हर्च्युअल (virtual) कॅल्क्युलेटर वापरता येईल.

ऑनलाइन पद्धतीने उमेदवार एका टेस्ट पेपरसाठी किंवा २ टेस्ट पेपरसाठी (पात्र असल्यास अधिकची फी भरून) अर्ज करू शकतात.

IIT, बॉम्बे झोनमधील परीक्षा केंद्र : अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, मुंबई /नवी मुंबई/ठाणे, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे, गोवा, वडोदरा, अहमदाबाद इ. केंद्रांवर JAM २०२५ परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांना एकाच झोनमधील ३ परीक्षा केंद्रांसाठी पसंतीक्रम द्यावयाचा आहे.

JAM २०२५ मेरिट लिस्ट १९ मार्च २०२५ रोजी https:// jam२०२५. iitd. ac. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

JAM-२०२५ टेस्ट पेपर्स आणि इतर माहिती वेळोवेळी https:// jam२०२५. iitd. ac. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

JAM-२०२५ परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार IIT मध्ये प्रवेश दिला जाईल. त्यासाठी उमेदवारांनी (JAM २०२५ मधून पात्र ठरलेल्या) JAM ऑनलाईन प्रोसेस सिस्टीम वेबसाईट (JOAPs) वर (https:// jam2025. iitd. ac. in) कोणत्या प्रोग्रॅमसाठी कोणत्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्याचा पसंतीक्रम ऑनलाइन भरावयाचा आहे.

Mock Test लिंकमधून JAM २०२५ परीक्षे अगोदर उमेदवारांना मॉक टेस्टची सोय JAM २०२५ च्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल.

JAM २०२४ साठी उमेदवारांनी https:// jam. iitm. ac. in या संकेतस्थळावर दि. ५ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आपले नाव रजिस्टर करून (JAM online application form (JOAPS)) अर्ज दाखल करावा. ऑनलाइन अर्जासोबत रंगीत फोटोग्राफ, सिग्नेचर, EWS/ SC/ ST/ PWD दाखले अपलोड करणे आवश्यक. OBC(NCL)/ EWS दाखले अपलोड करण्याचा दिनांक २० नोव्हेंबर २०२४.

अॅडमिट कार्ड ऑनलाइन अॅप्लिकेशन पोर्टलवरून डाऊनलोड करून प्रिंट दि. ६ जानेवारी २०२५ पासून उपलब्ध.

शंका समाधानासाठी फोन नं. ०११-२६५९१७४९ (सकाळी १० ते १२ व दुपारी २ ते ५ वाजे दरम्यान), ई-मेल jam@iitd. ac. in.

गुणवत्ता यादी १९ मार्च, २०२५ रोजी JAM २०२५ वेबसाईटवर प्रसिद्ध होईल.

JAM २०२५ करिता IIT बॉम्बे झोनसाठी वेबसाईट आहे http:// jam. iitb. ac. in. ई-मेल आयडी आहे jam@iitb. ac. in, फोन नं. ०२२-२५७६७०६८ / २५७६७०२२

इंटिग्रेटेड पीएच.डी. प्रोग्राम इन (BIological Sciences/ Chemical Sciences/ Mathematical Sciences/ Physical Sciences) करिता IISc बंगलोरमधील प्रवेशासाठी JAM २०२५ उत्तीर्ण करून IISc बंगलोर येथे वेगळा अर्ज करणे आवश्यक आहे.

JAM-२०२५ स्कोअरकार्ड (ज्यात उमेदवाराची ऑल इंडिया रँक दर्शविलेली असेल दि. २५ मार्च ते ३१ जुलै २०२५ दरम्यान डाऊनलोड करता येईल. / अॅडमिशन पोर्टल २ एप्रिल २०२५ पासून उपलब्ध होईल.)