अभियांत्रिकी तसेच आर्किटेक्चर यामधून पदवी उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात मास्टर्स डिग्री करायची असेल त्यांना त्या प्रवेशासाठी ‘गेट’ नावाची सीईटी द्यावी लागते. या सीईटीतून सर्व आयआयटी, सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच अनेक खासगी महाविद्यालयांमध्ये शिष्यवृत्तीसह प्रवेश देण्यात येतो. याशिवाय भेल, बीएसएनएल, गेल पासून सार्वजनिक क्षेत्रातील अनेक कंपन्या या सीईटीतील मार्कांआधारे नोकरीसाठी पण निवड करतात. दरवर्षी कोणती ना कोणती आय आय टी या सीईटीचे आयोजन व नियोजन करत असते. या वर्षी आयआयटी रुरकी या परीक्षेचे आयोजन करत आहे.

हेही वाचा >>> जिद्दीला सलाम! अपयशाची रांग असूनही केले अथक प्रयत्न अन् झाले जगातील सर्वात श्रीमंत IITian’sपैकी एक; जाणून घ्या विनोद खोसला यांची यशोगाथा

यंदा ही परीक्षा १ व २ तसेच १५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा कॉम्प्युटरवर होईल आणि प्रत्येक दिवशी दोन सत्रे होतील. ३० विषयांची परीक्षा असेल ज्यातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दोन विषयांची निवड करून परीक्षा देता येईल. पदवीच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपासून पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत कोणालाही ही परीक्षा देता येईल. परीक्षेचा स्कोअर तीन वर्षांपर्यंत पदव्युत्तर प्रवेशासाठी वापरता येतो. परीक्षा देशातील महत्त्वाच्या २०० शहरांमध्ये आणि महाराष्ट्रातील २५ शहरांमध्ये घेतली जाते. तीन तासांच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना ६५ प्रश्न सोडवावे लागतात त्यापैकी १० प्रश्न जनरल अॅप्टिट्यूड वर तर ५५ प्रश्न निवडलेल्या विषयावर आधारित असतात.

हेही वाचा >>> Success Story: नोकरी सोडून स्वतःच्या गावात सुरू केला मसाल्यांचा व्यवसाय; महिन्याला कमावतात लाखो रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनरल अॅप्टिट्यूडमध्ये इंग्रजी, सामान्य गणित व रिझनिंग अॅबिलिटी यावर आधारित प्रश्न असतात. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://gate2025.iitr.ac.in या संकेतस्थळावर २६ सप्टेंबर २०२४ पर्यंत भरता येतील. परीक्षेचा निकाल १९ मार्च २०२५ रोजी जाहीर होईल. परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम तसेच २००७ पासूनच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सायन्स किंवा आर्टस् शाखेतून पदवी / पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी, आय आय एस सी पासून अनेक संस्थांमध्ये पीएचडी करण्यासाठी सुद्धा याच ‘गेट’ परीक्षेतून मिळालेल्या मार्कांच्या आधारे प्रवेश मिळतो.