IDBI JAM 2024: ज्या तरुणांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे आणि जे अशा नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत उमेदवारांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदाच्या ५०० जागांसाठी भरती होणार आहे. या पदासंबंधीच्या अर्जाची प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ फेब्रुवारी असेल. इच्छुक उमेदवार http://www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

IDBI PGDBF -2024-25 : परीक्षा १७ मार्च रोजी घेतली जाईल. प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. ५०० जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.

IDBI Recruitment 2024 : वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २५ वर्षे यादरम्यान असावे.

IDBI Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे.

IDBI Recruitment 2024 : अर्ज शुल्क
SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २०० रुपये असेल. तर, इतर वर्गांतील उमेदवारांसाठी एक हजार रुपये अर्ज शुल्क असेल.

IDBI JAM प्रवेशपत्र 2024: कसे डाउनलोड करायचे ते जाणून घ्या..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • http://www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर, करिअर टॅबवर क्लिक करा.
  • पुढे, “पीजीडीबीएफ द्वारे कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – २०२४-२५” साठी कॉल लेटर लिंकवर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन तपशील तपासा आणि सबमिट करा.

हेही वाचा >> TIFR मुंबई येथे नोकरीची संधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

  • प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.