scorecardresearch

Premium

१० वी पास उमेदवारांना पुणे, मुंबई, देवळाली आणि अहमदनगर येथे नोकरीची संधी! HQ दक्षिण कमांड अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख,आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

HQ Southern Command Recruitment 2023
हेड क्वार्टर साउथर्न कमांड भरती २०२३. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

HQ Southern Command Recruitment 2023: हेड क्वार्टर दक्षिण कमांड येथील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर हेड क्वार्टर दक्षिण कमांड भरती २०२३ अंतर्गत कोणती पदे भरली जाणार? भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख,आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हेड क्वार्टर दक्षिण कमांड भरती २०२३ –

dharavi redevelopment project pvt ltd marathi news, dharavi business owners marathi news
धारावी पुनर्विकासात व्यावसायिकांना आता जीएसटी सवलतीचे गाजर…पण पुनर्विकास कोठे होणार याबाबत मौन!
softbank sells another 2 percent stake in paytm for rs 950 crore
पेटीएमने UPI व्यवहार करता? रिझर्व्ह बँकेकडून महत्त्वाचा निर्णय, नवी अपडेट काय?
mhada, house scheme, mill workers, eligibility, documents, mumbai,
मुंबई : पात्रता निश्चितीसाठी कागदपत्र जमा करण्याचे गिरणी कामगारांना आवाहन; गुरुवारी शेवटचा दिवस, मुदतवाढ मिळण्याची शक्यता
Digital saheli pilot project
डिजिटल सहेली! जाणून घ्या पथदर्शी प्रकल्पाची वैशिष्ट्ये…

एकूण रिक्त पदे – २४

पदाचे नाव व रिक्त पदे –

पदाचे नाव रिक्त पदे

 • MTS (मेसेंजर) – १३
 • MTS (डाफरी) – ३
 • कुक – २
 • वॉशरमन – २
 • मजदूर – ३
 • MTS (गार्डनर) – १

शैक्षणिक पात्रता –

 • कुक -१० वी पास + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
 • इतर सर्व पदांसाठी उमेदवार १० वी पास असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

 • खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
 • ओबीसी – ३ वर्षांची सूट
 • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट

अर्ज फी – अर्ज फी किती असेल याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

हेही वाचा- १० वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, आजच करा अर्ज

नोकरीचे ठिकाण -पुणे, मुंबई, देवळाली, अहमदनगर.

महत्वाच्या तारखा –

 • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १८ सप्टेंबर २०२३
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ ऑक्टोबर २०२३

भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1TL4EgciT2J4Cy7I00jpzP2DGBSPBOMdN/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunities for 10th pass candidates in pune mumbai deolali and ahmednagar recruitment started for various posts under hq southern command jap

First published on: 16-09-2023 at 16:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×