Mumbai Port Trust Bharti 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘सुरक्षा अधिकारी, कल्याण अधिकारी, वरिष्ठ कल्याण अधिकारी, Dy. व्यवस्थापक (कल्याण), हिंदी अधिकारी, हिंदी अनुवादक Gr.-II’ या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३ साठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – सुरक्षा अधिकारी, कल्याण अधिकारी, वरिष्ठ कल्याण अधिकारी, Dy. व्यवस्थापक (कल्याण), हिंदी अधिकारी, हिंदी अनुवादक Gr.-II.
एकूण पदसंख्या – १४
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदवीधर. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून पदानुसार सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.
हेही वाचा- पदवीधरांना नवी मुंबई महापालिकेत नोकरीची संधी! आरोग्य विभागा अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु
वयोमर्यादा –
- सुरक्षा कार्यालय आणि कल्याण अधिकारी – २१ वर्षांपेक्षा जास्त – ३० वर्षांपेक्षा कमी.
- वरिष्ठ कल्याण अधिकारी आणि हिंदी अधिकारी : २१ वर्षांपेक्षा जास्त – ३५ वर्षांपेक्षा कमी.
- उपव्यवस्थापक (कल्याण) : २१ वर्षांपेक्षा जास्त – ४० वर्षांपेक्षा कमी.
- हिंदी अनुवादक Gr.-II : २० वर्षांपेक्षा जास्त – ३० वर्षांपेक्षा कमी.
अर्जाची पद्धत – ऑनलाईन.
नोकरीचे ठिकाण – मुंबई</strong>
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ डिसेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.mumbaiport.gov.in
पगार –
- सुरक्षा अधिकारी – ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपये.
- कल्याण अधिकारी – ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपये.
- वरिष्ठ कल्याण अधिकारी – ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपये.
- Dy. व्यवस्थापक (कल्याण) – ६० हजार ते १ लाख ८० हजार रुपये.
- हिंदी अधिकारी – ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपये.
- हिंदी अनुवादक Gr.-II – २९ हजार ६०० रुपये ते ८१ हजार १०० रुपये.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1hbbEVu0gzj95LqzWPK76_2N6jU8VYsow/view