MSBSHSE Maharashtra SSC 10th Result 2024 Date: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत अधिसूचना जारी (MSBSHSE) निकालाची तारीख जाहीर केली आहे. बोर्डाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवार, २७ मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल. पत्रकार परिषदेद्वारे निकाल जाहीर केला जाणार आहे. या वेबसाइट्सवर थेट पाहा निकाल

या वर्षी दहावीची परीक्षेला बसलेले विद्यार्थी बोर्डाच्या mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. या वेबसाइट्सव्यतिरिक्त, विद्यार्थी sscresult.mkcl.org आणि results.digilocker.gov.in वर देखील निकाल पाहू शकतात. या वेबसाइट्सवर, विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि रोल कोड वापरून स्कोअरकार्ड तपासू शकतात.

विद्यार्थ्यांसाठी दुपारी 1 वाजता लिंक होईल सक्रिय

बोर्ड अधिकारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेद्वारे १० वीचा निकाल जाहीर करतील, परंतु विद्यार्थ्यांसाठी अधिकृत वेबसाइटवरील निकालाची लिंक दुपारी १ वाजता सक्रिय केली जाईल. यंदा महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्चदरम्यान झाली. यावर्षी सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

हेही वाचा…१० वीच्या निकालाच्या तारखेबाबत मोठी माहिती; महाराष्ट्र बोर्डाचं निकालाचं नियोजन कसं आहे? कुठे व कधी पाहाल, दहावीचे मार्क्स?

महाराष्ट्र बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेतील गुणांची आकडेवारी (२०२३)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२३ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेत २०२३ मध्ये ९३. ८३ टक्के म्हणजेच. एकूण १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांमध्ये १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. २०२३ च्या निकालात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.११ टक्के, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९२.०५ टक्के आहे. १५१ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. ६६ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर, १ लाख ९ हजार ३४४ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के गुण मिळाले आहेत.

SSC Result 2024 दहावीचा निकाल २०२४ – कसा तपासायचा?

महाराष्ट्र बोर्डाच्या १०वीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी एकदा निकाल जाहीर झाल्यावर त्यांचे निकाल ऑनलाइन पाहू शकतात. यासाठी लॉगिन विंडोमध्ये आवश्यक तपशील भरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र बोर्ड एसएससी मार्कशीट २०२४ ऑनलाइन कशी डाउनलोड करावी हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप १: अधिकृत वेबसाइटवर जा – mahahsscboard.in, mahresult.nic.in लॉगीन करा.

स्टेप २: मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC निकाल 2024 तपासण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करा

स्टेप ३: दिलेल्या जागेत आवश्यक तपशील भरा

स्टेप ४: महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2024 स्क्रीनवर दिसेल

स्टेप ५: त्यावर नमूद केलेल्या सर्व तपशीलांवर जा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा

SSC Result 2024 महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 – तपासण्याचे पर्यायी मार्ग

अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त, विद्यार्थी ऑफलाइन मोडमध्ये त्यांचा महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल पाहू शकतात. काहीवेळा वेबसाईटवर एरर येत असल्यानं विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासण्यात अडचणी येतात.अशावेळी खाली दिलेल्या काही संकेतस्थळांवरुन निकाल तपासू शकता.

हेही वाचा…Maharashtra SSC Result 2024: दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ आठवड्यात कधी लागणार निकाल जाणून घ्या

SSC Result 2024 पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –

१. http://www.mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://ssc.mahresults.org.in

SSC Result 2024 महाराष्ट्र बोर्डाचा निकाल एसएमएसद्वारे कसा पहावा

१. तुमच्या मोबाइलमध्ये एसएमएसचं अॅप घ्या.
२. यामध्ये महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी निकाल २०२४ साठी MHSSC सीट क्रमांक टाइप करा .
३. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १२वी निकाल २०२४ साठी MHHSC सीट क्रमांक टाइप करा .
४. त्यानंतर ५७७६६ वर एसएमएस पाठवा.

SSC Result 2024 दहावीचा निकाल पडताळणी प्रक्रिया

आपल्या गुणांबाबतीत समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या गुणांच्या पडताळणी प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

१. पडताळणी प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी पडताळणीबाबत विनंती करण्याची आवश्यकता आहे.
२. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी २८ मे ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरता येईल.
३. महाराष्ट्र बोर्डाने जून २०२४ मध्ये महाराष्ट्र बोर्ड दहावीचा पडताळणी निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे.