सुहास पाटील
यूपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे कॅलेंडर
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांतून १२ वी उत्तीर्ण आणि पदवी उत्तीर्ण उमेदवारांची केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत ग्रुप ‘बी’ (गॅझेटेड) आणि ग्रुप ‘ए’ पदांची भरती केली जाते.
UPSC समान पात्रतेचे निकष (जसे की १२ वी उत्तीर्ण, पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण, इंजिनीअरिंग पदवी, इकॉनॉमिक्स/ स्टॅटिस्टिक्समधील पदव्युत्तर पदवी इ.) असलेल्या ग्रुप ‘ए’ व ग्रुप ‘बी’ (गॅझेटेड) पदांसाठी विविध स्पर्धा परीक्षा घेत असते.
२०२४ मध्ये UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे कॅलेंडर दि. १० मे २०२३ रोजी जाहीर झाले आहे. वढरउ मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे नाव, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक, परीक्षा सुरू होण्याचा दिनांक, पात्रतेच्या अटी इ. तपशील पुढीलप्रमाणे –
(I) १२ वी उत्तीर्ण पात्रतेचे निकष असलेल्या परीक्षा –
(१) नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी अॅण्ड नेव्हल अॅकॅडमी एक्झामिनेशन (I) २०२४ – (NDA & NA Examination) (I) २०२४
परीक्षा सुरू होण्याचा दिनांक २१ एप्रिल २०२४ (१ दिवस).
(२) नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी अॅण्ड नेव्हल अॅकॅडमी एक्झामिनेशन-(II) २०२४ –
जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक १५ मे २०२४. परीक्षा सुरू होण्याचा दिनांक १ सप्टेंबर २०२४ (१ दिवस).
पात्रता : NDA मधील आर्मी विंगसाठी १२ वी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. NDA मधील एअरफोर्स आणि नेव्हल विंग्ज आणि INA मधील १०+२ कॅडेट एन्ट्री स्कीमसाठी १२ वी (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स विषयांसह) उत्तीर्ण. फक्त अविवाहीत पुरुष उमेदवार पात्र असतील.
वयोमर्यादा : १६ १/२ ते १९१/२ वर्षे. शारीरिक मापदंड – NDA मधील IAF च्या फ्लाईंग ब्रँचसाठी उंची – १६२.५ सें.मी.
NDA मधील IAF च्या ग्राऊंड ड्युटी ब्रँचसाठी उंची १५७.५ सें.मी. आर्मी आणि नेव्ही विंग्जसाठी – किमान उंची १५७ सें.मी.
वजन : उंची आणि वय यांच्या प्रमाणात उमेदवाराचे वजन असावे.
निवड पद्धती : लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप – पेपर-१ मॅथेमॅटिक्स – ३०० गुण; पेपर-२ जनरल अॅबिलिटी टेस्ट – ६०० गुण. इंग्लिश – २०० गुण, जनरल नॉलेज – ४०० गुण (सेक्शन (ए) फिजिक्स – १०० गुण, सेक्शन (बी) केमिस्ट्री – ६० गुण, सेक्शन (सी) जनरल सायन्स – ४० गुण, सेक्शन (डी) इतिहास, फ्रिडम मुव्हमेंट (सोशल स्टडीज) ८० गुण, सेक्शन (ई) जीओग्राफी – ८० गुण, सेक्शन (एफ) करंट इव्हेंट्स – ४० गुण) वेळ प्रत्येक पेपरसाठी २१/२ तास.
सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) टेस्ट/इंटरव्ह्यू – ९०० गुण.
(II) पदवी उत्तीर्ण पात्रतेचे निकष असलेल्या परीक्षा –
(३) सिव्हील सर्व्हिसेस (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन-२०२४ – CS(P) Examination 2024.
(४) इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन-२०२४ – (through CS(P) Exam 2024). जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक १४ फेब्रुवारी २०२४. परीक्षा सुरू होण्याचा दिनांक २६ मे २०२४ (१ दिवस).
पात्रता : CS(P) Exam साठी पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.
इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस (प्रीलिम) एक्झामिनेशनसाठी अॅनिमल हजबंडरी अॅण्ड वेटेनिअरी सायन्स/ बॉटनी/ केमिस्ट्री/ जीओलॉजी/ फिजिक्स/ मॅथेमॅटिक्स/ स्टॅटिस्टिक्स/ झूऑलॉजी/ अॅग्रिकल्चर/ फॉरेस्ट्री/ इंजिनीअरींग इ. मधील पदवी उत्तीर्ण.
(उर्वरीत उद्याच्या अंकात)