PMPML Recruitment 2024 : पुणे महानगर परिवहन मंडळात ‘मार्केटिंग अधिकारी’ या पदासाठी भरती सुरू आहे. त्यासाठी एकूण दोन रिक्त जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या मुलाखती २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यामध्ये होणार आहेत. मार्केटिंग अधिकारी या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता निकष आणि मुलाखतीचा पत्ता यांची माहिती पाहा.

PMPML Recruitment 2024 : पात्रता निकष

पुणे महानगर परिवहन मंडळामध्ये मार्केटिंग अधिकारी या पदासाठी दोन जागांवर भरती होणार आहे. या पदासाठी मुलाखत देणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडे मार्केटिंग क्षेत्रातील एमबीए [MBA] हे शिक्षण असणे अनिवार्य आहे. तसेच त्या क्षेत्रात किमान सात वर्षांचा अनुभव असायला हवा. या पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना ५०,०००/- रुपये वेतन सुरू होईल.

हेही वाचा : MSAMB recruitment 2024 : पुण्यात नोकरीची संधी उपलब्ध; जाणून घ्या अर्जासाठी पात्रता निकष…

PMPML Recruitment 2024 – अधिकृत वेबसाईट –
https://pmpml.org/

PMPML Recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1I8ALjZq-DkKRJ5LU9UkX6LFdYS0W6eAn/view

PMPML Recruitment 2024 : अर्ज आणि मुलाखत

मार्केटिंग अधिकारी या पदासाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
त्यामुळे या पदांसाठी पात्र ठरलेल्या, तसेच इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – पीएमटी बिल्डिंग, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे-४११०३७.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरील रिक्त पदांसाठी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुलाखतीला येताना उमेदवाराकडे सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
मार्केटिंग अधिकारी या पदाच्या मुलाखतीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास वर दिलेली अधिसूचना वाचावी. अथवा वर दिलेल्या पुणे महानगर परिवहन मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.