scorecardresearch

Premium

पदवीधरांना पुण्यात नोकरीची मोठी संधी! PMC अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, महिना २१ हजारांहून अधिक पगार मिळणार

पुणे महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Pune Mahanagarpalika Bharti 2023
पुणे महानगरपालिका भरती २०२३. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : पुण्यात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे अंतर्गत ‘क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२३ आहे. पुणे महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पुणे महानगरपालिका भरती २०२३ –

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti For 38 Human Resource Coordinator location for this recruitment is Mumbai
BMC Bharti 2024: पदवीधरांना नोकरीची संधी; BMC अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरू, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
Thane Municipal Corporation Recruitment 2024
TMC Recruitment 2024: ठाणे महापालिकेत २८९ जागांसाठी भरती; पगार 1 लाखापर्यंत, जाणून घ्या Details
DFSL Maharashtra Bharti 2024
DFSL Bharti 2024: १०, १२ वी, पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! १२५ रिक्त जागा, जाणून घ्या तपशील
Jalgaon people morcha
या मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी जळगाव दुमदुमले, प्रलंबित प्रश्‍नांसाठी लोकसंघर्षचा बिर्‍हाड मोर्चा

पदाचे नाव – क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर.

एकूण पदसंख्या – १६

शैक्षणिक पात्रता –

  • BSC पदवी.
  • ४० श.प्र.मि. इंग्रजी आणि ४० श.प्र.मि. मराठी टायपिंग सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा पास.

नोकरीचे ठिकाण- पुणे</p>

हेही वाचा – १० वी पास, ITI ते पधवीधर उमेदवारांना AIASL मध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदांच्या ८२८ जागांसाठी भरती सुरु

पगार – २१,८४० रुपये महिना.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – ३८ वर्षे.

मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ४३ वर्षे.

अर्जाची पद्धत – ऑफलाईन.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट –

https://pmc.gov.in/

महत्वाची कागदपत्र –

  • जन्म तारखेचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
  • फोटो आयडी : आधारकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना / पॅनकार्ड इ.
  • टायपिंग प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र. (आवश्यक असल्यास)

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1Mpz9UrG0MlgE9XfsMTSEZxOVyLxGSLCL/view

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune mahanagarpalika bharti 2023 job opportunities for graduates in pune recruitment for clerk cum data entry operator post under pmc is started jap

First published on: 09-12-2023 at 12:17 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×