Success Story: लहान वयात प्रसिद्धी मिळवणे ही गोष्ट तितकी सोपी नाही. परंतु, काही जण कठोर परिश्रम आणि समर्पणाने या सर्व गोष्टी साध्य करतात. भारतामध्ये असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात शून्यापासून केली आणि मेहनतीच्या जोरावर साम्राज्य स्थापन केले. आज आम्ही त्रिशनीत अरोरा यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांनी शाळा सोडल्यानंतर २०१३ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्याची पायाभरणी केली. आता त्रिशनीत अरोरा हे देशातील टॉप १० तरुण अब्जाधीश उद्योजकांपैकी एक आहेत.

लहान वयात उभी केली करोडोंची कंपनी

त्रिशनीत अरोरा हे TAC सिक्युरिटीचे संस्थापक आणि CEO आहेत. तसेच ते हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२४ मध्ये स्थान मिळवणाऱ्या सर्वात तरुण भारतीयांपैकी एक आहेत. TAC सिक्युरिटी ही कंपनी आता १,१०० कोटी असून ही एक सायबर सुरक्षा आणि vulnerability व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. जेव्हा त्रिशनीत यांनी चंदीगडमध्ये ही कंपनी सुरू केली तेव्हा ते अवघ्या १९ ​​वर्षांचे होते. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, त्रिशनीत अरोरा यांनी बारावीत नापास झाल्यानंतर शाळा सोडली. मात्र, त्यांचे डिजिटल जगाप्रती आकर्षण असल्यामुळे त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी TAC सुरक्षा सुरू केली. वयाच्या २३ व्या वर्षी ते भारतातील सर्वात तरुण हॅकर्सपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्रिशनीत यांनी पंजाब आणि गुजरात राज्य सरकारांसाठी आयटी सल्लागार म्हणूनही काम केले आहे. तसेच त्यांनी या राज्यांमध्ये सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग केला आहे.

हेही वाचा: Success Story : कुली म्हणून करायचे काम, मोफत Wifi च्या मदतीने अभ्यास करून दिली UPSC परीक्षा अन् झाले IAS अधिकारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुकेश अंबानींच्या कंपन्यांचाही सिक्युरिटीच्या क्लायंट लिस्टमध्ये समावेश

त्रिशनीत अरोरा यांच्या कंपनी TAC सिक्युरिटीच्या क्लायंट लिस्टमध्ये मुकेश अंबानींच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रीज, अमूल, बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज), सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) इत्यादी मोठ्या नावांचा समावेश आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, भारत, यूएस, यूके आणि कॅनडा यांसह १५ देशांमध्ये टेक फर्मचे १५० हून अधिक ग्राहक आहेत.