Success Story Of Abin Gopi In Marathi : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा दरवर्षी घेतली जाते. पण, या परीक्षेत यशस्वी झालेल्या काही उमेदवारांच्या कथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतात. काही जण परीक्षेत अपयशी ठरतात, तर काही जण वैयक्तिक गोष्टींवर मात करून हा प्रवास अगदी यशस्वीरीत्या गाठतात. तर आज अशीच एक प्रेरणादायी कहाणी आयएएस अबीन गोपीची आहे; ज्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व अडचणींना तोंड दिले. चला तर जाणून घेऊया अबीन गोपी यांची सक्सेस स्टोरी…
कोण आहे अबीन गोपी?
केरळचे रहिवासी असलेले आयएएस अबीन गोपी यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. अबीनचे वडील उदरनिर्वाहासाठी नारळाच्या झाडावर चढायचे. पण, अबीन फक्त १७ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले; ज्यामुळे त्याचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले. कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आल्याने अबीनला कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी वेगवेगळ्या नोकऱ्या कराव्या लागल्या.
१५-१५ तास अभ्यास करायचा (Success Story)
अबीनने कुटुंबाला आधार देण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी रंगारी, डिलिव्हरी बॉय, वेटर म्हणून काम केले. याचबरोबर त्याने शिक्षण सुद्धा सुरू ठेवले आणि कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचा दृढनिश्चय केला. शिक्षण हे चांगल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे हे लक्षात ठेवून त्यांनी यशस्वी होण्याचा दृढनिश्चयी केला. २०१९ मध्ये, अबीनने त्याच्या नोकऱ्या सोडून फक्त त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्याने युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. अबीन दिवसाचे १५-१५ तास अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण झाला. अबीनला त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि चिकाटीचे फळ २०२१ मध्ये मिळाले; जेव्हा त्याने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षेत त्याने चांगले गुण मिळवले आणि महसूल विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून त्याची निवड झाली.