Success Story: स्वप्न साकार करण्याची जिद्द ही नेहमी वयापेक्षा मोठी ठरते. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगण्याचा प्रयत्न करते. परंतु, प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला डॉक्टर व्हायचे असते. कोणाला व्यावसायिक, तर कोणाला आणखी काही. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करीत असतात; तर काही जणांना लहान वयातच खूप यश मिळते. आज अशाच एका मुलीची प्रेरणादायी कथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ज्या वयात विद्यार्थी दहावी पास करून करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे हा विचार करीत असतात. त्याच वयातील एका मुलीने स्वतःचे करिअर घडवले आहे. तिच्या या कामगिरीमुळे ती सर्वांसाठीच एक आदर्श ठरली आहे. या मुलीचे नाव प्रांजली अवस्थी असून, तिने अमेरिकेत १०० कोटींची स्वतःची कंपनी स्थापन केली. तिच्या एआय स्टार्टअपने तंत्रज्ञानाच्या युगात एक नवा अध्याय जोडला आहे.

प्रांजलीचे शिक्षण आणि बालपण

प्रांजली अवस्थीचा जन्म उत्तर प्रदेशात झाला असून, तिचे वडील कॉम्प्युटर सायन्स इंजिनीयर आहेत. प्रांजलीचे बालपण तांत्रिक वातावरणात गेले. वयाच्या ११ व्या वर्षी प्रांजली तिच्या कुटुंबासह अमेरिकेत गेली. तिथे तिला तंत्रज्ञान, ओपन सोर्स प्रोजेक्ट्स व आर्टिफिशियल इंटेलिजेंस यांच्या जगाशी जोडण्याची संधी मिळाली. या आवडीमुळे प्रांजलीने वयाच्या १३ व्या वर्षी प्रोग्रामिंग शिकण्यास सुरुवात केली आणि वयाच्या १५ व्या वर्षी तिचे स्टार्टअप सुरू केले.

प्रांजलीने Delv.AI नावाची एक एआय स्टार्टअप कंपनी तयार केली, जी इंटरनेटवर पसरलेल्या असंख्य डेटाला फिल्टर करते आणि त्याचे उपयुक्त व संरचित माहितीमध्ये रूपांतर करते. आज Delv.AI चे मूल्य $१२ दशलक्ष म्हणजे सुमारे १०० कोटी रुपये आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ व्या वर्षी झाली CEO

या प्रवासात तिला अमेरिकेतील सर्वांत प्रतिष्ठित स्टार्टअप अ‍ॅक्सिलरेटर वाय कॉम्बिनेटरकडून निधी मिळाला. तिला टेकक्रंच डिस्रप्टसारख्या प्लॅटफॉर्मवर आमंत्रित करण्यात आले आणि अनेक जागतिक प्लॅटफॉर्मवर एक तरुण एआय उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले. वयाच्या १६ व्या वर्षी प्रांजली १०० करोडच्या कंपनीची CEO आहे.