News Flash

मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना

इयत्ता १० वी १२वी अनुत्तीर्ण अल्पसंख्याक उमेदवारांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरू करणे.

अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समूहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी अल्पसंख्याक उमेदवारासाठी मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना ही महत्त्वाची योजना आहे.

उद्देश

  • राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारांना शासकीय/निमशासकीय सेवेत रोजगारांच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देणे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग/बँकिंग सेवा इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमामधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण.
  • इयत्ता १० वी १२वी अनुत्तीर्ण अल्पसंख्याक उमेदवारांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरू करणे.

उपक्रम

या योजनेंतर्गत राज्यातील मुंबई, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे व नाशिक या शहरांमध्ये प्रशिक्षण केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची जबाबदारी

  • उमेदवारांची यादी तयार करणे.
  • उमेदवारांसाठी जाहिरात देणे.
  • उमेदवारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाहून प्राधान्यक्रम निश्चित करणे.
  • उमेदवाराच्या हजेरीबाबत मासिक, तिमाही अहवाल शासनास सादर करणे.
  • उमेदवारांची माहिती ठेवणे, शासनासमोर सादर करणे.
  • उमेदवारांसोबत संपर्क, समन्वय ठेवणे.
  • आवश्यकता भासल्यास उमेदवारांची चाळणी परीक्षा घेणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2017 1:34 am

Web Title: maulana azad free tutorial
Next Stories
1 नोकरीची संधी
2 करिअरमंत्र
3 ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनची मॅट : डिसेंबर २०१७
Just Now!
X