22 October 2020

News Flash

पंतप्रधानांच्या रॅलीत झालेल्या स्फोटातील आरोपीला उमेदवारी अर्ज भरताना अटक

अटकेनंतर न्यायालयात हजर केले गेले. त्यानंतर थेट तुरूंगात रवानगी

प्रतिकात्मक छायाचित्र

बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान मुजफ्फरपुर येथे एक मोठी अटक झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या आणि विधानसभा निवडणुकीतील महाआघाडीचा उमेदवार आफताब आलम यास पोलिसांनी अटक केली आहे.

अटकेनंतर आफताब आलम यास तात्काळ न्यायालयात हजर केले गेले. जिथून त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली. अटकेची कारवाई करणारे पोलीस अधिकार ओम प्रकाश म्हणाले की, औराई ठाणे क्षेत्रातील एका गुन्हेगारी प्रकरणात पोलीस आफताब आलमच्या शोधात होते.
फरार असूनही आफताब आलम उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आला होता. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थिती पोलिसांनी त्याला अटक केली.

एक राजकीय षडयंत्र असल्याचे आफताब आलमने म्हटले आहे. ज्या प्रकरणी आफताबला अटक करण्यात आली ते एका हत्याकांडानंतर झालेल्या धरणे आंदोलनाचे प्रकरण आहे. तर, याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे आफताबचे म्हणने आबे. या अगोदर आफताब आलमला एनआयएने देखील अटक केली होती. आफताब आलमचे नातगल पाकिस्तानमध्ये आहेत आणि सासरवाडी देखील पाकिस्तानातीलच आहे.

पटणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान स्फोटांप्रकरणी आफताब आलमला मुजफ्फरपुर येथून एनआयएने अटक केली होती. या प्रकरणी ते सध्या बेलवर आहेत. औराई विधानसभा जागेवरून महाआघाडीच्या कोट्यातून भाकपा (माले) कडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही अटक बिहारमध्ये महाआघाडीसाठी एक मोठा झटका असू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 3:25 pm

Web Title: accused of blast at pm rally arrested while filing nomination papers msr 87
Next Stories
1 राहुल गांधी नाही, राहुल लाहोरी; भाजपा नेत्याचा काँग्रेस नेतृत्वावर हल्लाबोल
2 … तर तुम्हाला घरपोच सिंलिडर मिळवण्यासाठी येऊ शकते अडचण
3 बलिया हत्याकांड : फरार मुख्य आरोपी धीरेंद्र सिंहला लखनऊमध्ये अटक
Just Now!
X