01 March 2021

News Flash

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का!, आमदार अरिंदम भट्टाचार्य भाजपात जाणार

पश्चिम बंगालचे भाजपा प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थित दिल्लीत होणार पक्षप्रवेश

(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकी अगोदर आणखी एक धक्का बसला आहे. कारण, टीएमसीचा आणखी एक आमदार भाजपाच्या गळाला लागला आहे. शांतीपूरचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी पक्ष सोडून, भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भट्टाचार्य पश्चिम बंगालचे भाजपा प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत भाजपात प्रवेश करणार आहेत. भट्टाचार्य यांनी काँग्रेसच्या तिकीटावर २०१६ मध्ये निवडणूक जिंकली होती व त्याच्या पुढील वर्षीच त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

या अगोदर ममता बॅनर्जींना सोडून टीएमसीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केलेल आहे. तर, मागील महिन्यातच ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील शुभेंदु अधिकारी यांनी देखील सहा ते सात टीएमसीच्या नेत्यांसह भाजपात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जींसमोर पक्षाची गळती थांबवण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 4:26 pm

Web Title: arindam bhattacharya tmc mla from shantipur to join bjp msr 87
Next Stories
1 TRP Scam : बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा कोर्टानं फेटाळला जामीन
2 जम्मू-काश्मीर – एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा, चार जवान जखमी
3 “आम्ही आदेश देणार नाही,” शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्याची केंद्राची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Just Now!
X