येथील रुबी पार्कच्या दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अरुणवा चंदा (१९) याने सॅट या पात्रता परीक्षेत उत्तम गुण मिळवल्यानंतर त्याला आता अमेरिकेतील नामांकित विद्यापीठात प्रवेशाचा देकार समोर ठेवला आहे.
अमेरिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठीची प्रमाणित परीक्षा त्याने चांगल्या गुणांना उत्तीर्ण केली असून तो यंदा तो बारावीच्या परीक्षेला बसला होता. हार्वर्ड, स्टॅनफर्ड, कोलंबिया या विद्यापीठांपैकी कुठल्याही नामांकित विद्यापीठात त्याला प्रवेश मिळू शकतो.
त्याला हार्वर्ड, स्टॅनफर्ड, कोलंबिया, डय़ुक, कॉर्नेल, जॉर्जिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, डार्टमाउथ कॉलेज येथे त्याला प्रवेश मिळू शकतो.
नियमाबाहेर जाऊन त्याला कोलंबिया व डय़ुक विद्यापीठाने त्याला आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. अरुणवा पाचवीत असताना त्याची आई बनी हिने डॉक्टर व रुग्णालय प्रशासकाची नोकरी सोडली व मुलाकडे लक्ष दिले. त्याचे वडील अमिताभ हे न्यूरोसर्जन आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2014 रोजी प्रकाशित
अरुणवा चंदा याला अमेरिकेतील अनेक नामवंत विद्यापीठांत प्रवेशासाठी देकार
येथील रुबी पार्कच्या दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अरुणवा चंदा (१९) याने सॅट या पात्रता परीक्षेत उत्तम गुण मिळवल्यानंतर त्याला आता अमेरिकेतील नामांकित विद्यापीठात प्रवेशाचा देकार समोर ठेवला आहे.
First published on: 21-04-2014 at 02:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arunava chanda gets addmision in us universities