News Flash

शाईहल्ला देशासाठी चिंताजनक – लालकृष्ण अडवाणी

लालकृष्ण अडवाणी म्हणाले, सुधींद्र कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याचा मी निषेध करतो.

अडवाणी म्हणाले, हा हल्ला कोणी केला ते मला माहिती नाही. पण हे कृत्य देशासाठी चिंताजनक आहे.

सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर कोणी हल्ला केला हे मला माहिती नाही. पण जे घडले ते देशासाठी चिंताजनक असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमवारी व्यक्त केले.
‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी सोमवारी सकाळी शाई फेकली. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ‘ओआरएफ’कडून मुंबईमध्ये ठेवण्यात आला आहे. त्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर अज्ञात व्यक्तींनी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकली.
यावर प्रतिक्रिया देताना अडवाणी म्हणाले, सुधींद्र कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याचा मी निषेध करतो. हा हल्ला कोणी केला ते मला माहिती नाही. पण हे कृत्य देशासाठी चिंताजनक आहे. माझे अजून सुधींद्र कुलकर्णी यांच्याशी बोलणे झालेले नाही. शाई फेकण्याची कृती अत्यंत चुकीची आहे. यातून वाढती असहिष्णूता दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 1:57 pm

Web Title: attack on kulkarni shows growing intolerance condemn it advani
टॅग : Sudheendra Kulkarni
Next Stories
1 भारताच्या उत्कर्षासाठी हिंदूंचा विकास गरजेचा- मोहन भागवत
2 बिहार निवडणूक : पहिल्या टप्प्यात ५७ टक्के मतदान
3 घटनेचे अनुच्छेद ३७० कायमस्वरूपी , जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Just Now!
X