30 September 2020

News Flash

जनगणनेच्या माहितीचे पहिल्यांदाच ऑनलाइन संकलन

ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात प्री टेस्ट होणार

देशात 2021 मध्ये जनगणना करण्यात येणार असून पहिल्यांदाच जनगणनेच्या माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 या कालावधीत देशातील काही ठराविक जिल्ह्यांतील गावांमध्ये आणि शहरांमध्ये याची प्री टेस्टदेखील करण्यात येईल.

आगामी जनगणनेमध्ये काही मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांच्या पार्श्वभूमीवर 3 जून ते 11 जून या कालावधीत पुण्यातील यशदा येथे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील जनगणना संचालिका रश्मी झगडे यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले होते. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगण आणि गोव्यातील प्रशिक्षकांना पुण्यात प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान, हे प्रशिक्षक आता जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत.

ही चाचणी जनगणनेची रंगीत तालीम आहे. त्यामुळे याच्या प्रत्येक चरणात चांगले काम झाल्यास जनगणनेची प्रश्नावली, सुचना पुस्तिका, माहिती संकलित करण्याची पद्धत सुनिश्चित करणे शक्य होणार असल्याचे रश्मी झगडे यांनी सांगितले. 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर ही प्री टेस्ट महत्त्वाची आहे. पहिल्यांदाच जनगणनेच्या माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने होणार आणि त्याचीच चाचणी यादरम्यान होणार आहे. 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेची माहिती ऑनलाइन पद्धतीने संकलित झाल्यास सरकारलाही धोरणांच्या निश्चितीसाठी आवश्यक असलेली माहिती उपलब्ध होईल, असे मत जनगणना आयुक्त विवेक जोशी यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 10:45 am

Web Title: census 2021 information collected will keep online first time jud 87
Next Stories
1 बंगालमधील आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर; 700 डॉक्टरांचे राजीनामे
2 S-400 खरेदी व्यवहार : अमेरिकेची भारताला पुन्हा धमकी
3 देशभरात डॉक्टरांचे आंदोलन तीव्र
Just Now!
X