27 January 2020

News Flash

चांद्रयान-2 पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने झेपावले

आज चांद्रयान 2 चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला.

चांद्रयान 2 ने मंगळवारी मध्यरात्री आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मंगळवारी रात्री 2 वाजून 21 मिनिटांनी चांद्रयान पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने झेपावल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) ट्रान्स लूनर इंजेक्शनला यशस्वीरित्या पूर्ण केले. यादरम्यान स्पेसक्राफ्टचे लिक्विड इंजिन 1,203 सेकंदासाठी फायर करण्यात आले. यानंतर 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावले.

पुढील सहा दिवस चांद्रयान आपला चंद्राच्या दिशेने प्रवेश सुरू ठेवणार असून 4.1 लाख किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. यानंतर 20 ऑगस्ट रोजी चांद्रयान-2 हे चंद्राच्या कक्षेत पोहोचेल,अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी दिली. चंद्राच्या नजीक पोहोचल्यानंतर चांद्रयान-2 चे प्रोपल्शन सिस्टम पुन्हा एकदा फायर करण्यात येणार आहे. यामुळे या यानाची गती कमी होईल. त्यामुळे हे यान चंद्राच्या प्राथमिक कक्षेत स्थिरावणार आहे. यानंतर पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर चांद्रयान दोन फेऱ्या मारेल. प्रोपल्शन सिस्टमच्या मदतीने चांद्रयान 2 ची कक्षा कमी केली जाणार असल्याची माहिती, सिवन यांनी दिली.

आज चांद्रयान 2 चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला. 20 ऑगस्टला चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. तीन सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल. भारताच्या या महत्वकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर पाण्यासह अन्य अनेक नवीन गोष्टी शोधून काढण्याचा चांद्रयान 2 चा प्रयत्न असेल.

First Published on August 14, 2019 8:16 am

Web Title: chandrayaan2 depart from earths orbit and move towards the moon reach orbit 20 august jud 87
Next Stories
1 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार: सत्यपाल मलिक
2 दोन मिनिटांच्या फोनसाठी दोन तास रांगेत अन् नंतर फक्त हुंदकेच
3 काश्मीर प्रश्नी अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव नाही – हर्षवर्धन शृंगला
Just Now!
X