News Flash

काँग्रेस हायकमांडकडून अशोक गेहलोत यांची कानउघडणी

सचिन पायलट यांना निकम्मा म्हटले...

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याबद्दल ‘निकम्मा’, ‘नकारा’ असे शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची कानउघडणी करण्यात आली. अशोक गेहलोत यांनी वापरलेली भाषा पूर्णपणे चुकीची होती, असे वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले.

सचिन पायलट यांच्यावर टीका करताना अशोक गेहलोत यांनी निकम्मा-नकारा हे शब्द वापरले, त्याबद्दल हायकमांडकडून त्यांची कानउघडणी करण्यात आली. आपल्या माजी उपमुख्यमंत्र्याबद्दल अशा पद्धतीच बोलणं, तुम्हाला शोभत नाही, असे पक्ष नेतृत्वाकडून गेहलोत यांना सांगण्यात आले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- “मी काय इथं भाजीपाला विकायला नाहीये, मी…”; पायलट यांच्यावर गेहलोत संतापले

“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून तो निकम्मा, नकारा आहे, काही काम करत नाही हे आम्हाला ठाऊक होते” असे गेहलोत सचिन पायलट यांच्याबद्दल बोलताना म्हणाले. अशोक गेहलोत यांनी कुठेही सचिन पायलट यांचे नाव घेतले नाही. अशोक गेहलोत यांनी केलेल्या टिकेवर सचिन पायलट यांनी काहीही प्रत्युत्तर दिलेले नाही.

आणखी वाचा- सचिन पायलट यांनी सोडलं मौन; ‘त्या’ आमदाराविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करणार”

सचिन पायलट यांच्या पक्षात परतण्याची आशा काँग्रेसने अजूनही सोडलेली नाही. सचिन पायलट यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करत आहेत. आता ही लढाई कोर्टात गेली आहे. पुढच्या काही दिवसात काँग्रेस विश्वासदर्शक ठरावाला सामोरी जाईल. उच्च न्यायालय काय निर्णय घेतं त्यावर पुढची दिशा ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 1:33 pm

Web Title: congress high command reprimands ashok gehlot over nikamma jibe against sachin pilot dmp 82
Next Stories
1 Coronavirus: आईला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा एकामागोमाग मृत्यू; देशातील पहिलीच अशी ह्रदयद्रावक घटना
2 धक्कादायक! …म्हणून जिल्हा रुग्णालयात ६ वर्षाच्या नातवालाच ढकलावं लागलं आजोबांचं स्ट्रेचर
3 राम मंदिराच्या भूमिपूजनाला मोदींसोबत आडवाणीही उपस्थित राहणार
Just Now!
X