दिल्लीतील न्यायालयाने २६ जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आणखी एका खटल्यात दीप सिद्धूला जामीन मंजूर केला आहे. दीप सिद्धू यापूर्वी १४ दिवस पोलीस कोठडीत होता. त्याची चौकशी पोलिसांनी केली आहे. यापूर्वीच्या मुख्य प्रकरणातही त्याला या आधारावरच जामीन देण्यात आला होता. त्यामुळे आता तर ७० दिवस झाले आहेत. या आधारावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

यापूर्वी दिल्ली हिंसाचार प्रकरणात दिल्ली न्यायालयाने त्याचा जामीन दिला आहे. दीप सिद्धूला तीस-तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने जामीन देताना काही अटी आणि शर्थी ठेवल्या होत्या. त्याला त्याचा पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यास सांगितला होता. त्याचबरोबर तो वापरणार असलेल्या फोन नंबरची नोंद तपास अधिकाऱ्याकडे करण्यास सांगितली होती. या फोनचं लोकेशन २४ तास ऑन ठेवण्याबरोबर फोन स्विच ऑफ करण्यास मनाई केली आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि १५ तारखेला आपलं लोकेशन सांगण्याची अट ठेवली आहे.

विडी कामगाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले २ लाख रुपये; म्हणाला, ‘मी विड्या वळून…’

दरम्यान, तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान २६ जानेवारी रोजी दिल्लीत हिंसाचार झाला होता. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक झेंडा फडकावला होता. त्यानंतर दीप सिद्धूला अटक केली होती. २३ फेब्रुवारीला त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.