कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेस नेत्यांमध्ये रंगलेले शाब्दिक युद्ध आणखीनच भडकण्याची शक्यता आहे. येथील करकाला मतदारसंघातील आमदार सुनिल कुमार यांनी निवडणुकांसदर्भात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलेआगामी निवडणुका म्हणजे राम विरुद्ध अल्लाहची लढाई असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंतवाल मतदारसंघात ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी काँग्रेसचे रामनाथ राय आणि भाजपाचे राजेश नायक यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सुनील कुमार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ही निवडणूक म्हणजे राम विरुद्ध अल्लाह अशी लढाई आहे. त्यामुळे आता हिंदूंना ठरवायचे आहे की, येथे राम जिंकणार की अल्लाह जिंकणार.

संघ आणि भाजपवाले माणुसकी नसलेले हिंदू – सिद्धरमय्या

रामनाथ राय यांनी अलीकडेच आपल्या सातत्याने होणाऱ्या विजयाचं सर्व श्रेय अल्लाह आणि मुस्लिमांच्या धर्मनिरपेक्ष वृत्तीला दिले होते. रामनाथ राय बंतवालमधून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आता बंतवालमधील जनतेनेच कोणाला निवडून द्यायचे, हे ठरवावे. तुम्ही पुन्हा एकदा अल्लाहच्या समर्थकांना निवडून देणार की रामाच्या समर्थकाला विजय मिळवून द्यायचा, हे तुम्हालाच ठरवायचे आहे. ही लढत फक्त काँग्रेस आणि भाजपामधील राहिले नसल्याचे सुनील कुमार यांनी म्हटले. दरम्यान, चिथावणीखोर आणि द्वेषमुलक वक्तव्य केल्याप्रकरणी सुनील कुमार यांच्याविरोधात कलम १५३ (अ) आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

‘हिंदुत्त्व हाच मोदी सरकारचा एकमेव अजेंडा’