हरयाणामधील गोहाना येथे बुलेट बाइकमध्ये बदल करुन तिच्या धुरांड्यातून मोठा आवाज काढणं अनेकांना चांगलच महागात पडत आहे. पोलिसांनी बुलेट बाईक मॉडिफाय करुन तिचा फटाक्यांप्रमाणे मोठा आवाज काढत फिरवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गोहाना-जिंद मार्गावरील मुलींच्या महाविद्यालयासमोर एका अशाच एका मुलावर पोलिसांनी कारवाई केली. हा मुलगा आपल्या बुलेटवरुन आवाज करत जात असतानाच मागून आलेल्या पोलिसांच्या जीपमधील हवालदारांनी या मुलाला थांबण्यास सांगून त्याच्यावर कारवाई करत बुलेटसहीत त्याला पोलीस स्थानकात घेऊन गेले.

पोलिसांनी या तरुणाकडे गाडीची कागदपत्र मागितली असता त्याच्याकडे गाडीचे कागदपत्र नव्हते. तसेच गाडीवर नंबर प्लेटऐवजी ‘नम्बरदार’ असं लिहिण्यात आलं होतं. पोलिसांनी या सर्व प्रकरणांसाठी तब्बल ५६ हजार रुपयांचं चलान फाडलं. तसेच चलान भरत नाही तोपर्यंत गाडी पोलिसांच्याच ताब्यात पोलीस चौकीच्या आवारात ठेवण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
child who fell into the open canal rescued
सोलापूर: उघड्या कूपनलिकेत पडलेल्या बालकास सुखरूप बाहेर काढण्यास यश
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी

मागील काही दिवसांपासून गोहाना पोलिसांनी बुलेट चालकांविरोधात मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत मोठ्या आवाजाच्या अनेक बुलेट चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. गोहानामध्ये मागील तीन दिवसांमध्ये सात ते आठ बाईक चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी अनेक तरुण कागदपत्र, परवाना तसेच इतर नियमांचे उल्लंघन करत मोठ्या आवाजाच्या गाड्या फिरवताना अनेकदा दिसतात. त्यामुळेच पोलिसांनी हाती घेतलेल्या या मोहिमेअंतर्गत तीन दिवसांमध्ये तब्बल दोन लाख ३४ हजार रुपयांचा दंड बाईकस्वारांना ठोठावण्यात आलाय.

यासंदर्भात न्यूज १८ शी बोलताना गोहाना शहराच्या पोलीस प्रमुख सवित कुमार यांनी महिलांच्या कॉलेजसमोर मोठ्या आवाजाच्या बुलेट बाईक घेऊन जाताना आम्ही त्यांच्यावर कारवाई केल्याचं म्हटलं आहे. अनेकदा या मुलांकडे कोणतीही कागदपत्र नसल्याचे दिसून येतं. नंबर प्लेट नसणे, बाईकचा मोठा आवाज, कागदपत्र नसणे या सर्व प्रकरणांमध्ये एका बाईकस्वाराला ५६ हजारांचा दंड करण्यात आल्याची माहिती कुमार यांनी दिली. मोठ्या आवाजातील बाईक्समुळे अनेकदा पदचाऱ्यांना त्रास होतो. तसेच अनेकदा या आवाजामुळे वयस्कर व्यक्तींनाही त्रास होतो.