News Flash

माहिती अधिकार विषयावर प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रम

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ त्या विषयात प्रमाणपत्र व पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार आहे.

माहिती अधिकार कायद्याचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ त्या विषयात प्रमाणपत्र व पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार आहे. केंद्रीय माहिती आयुक्तालयाच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम तयार करून ते राबवले जाणार आहेत. सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना या अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे राहील. यासाठी कैद्यांनाही प्रवेश खुला आहे. पत्रकारही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील.

विद्यापीठाचे कुलगुरू नागेश्वर राव यांनी म्हणाले, अनेकांना माहिती अधिकारातील तांत्रिक गोष्टी माहिती नाहीत. माहिती अधिकारात प्रश्न विचारताना तो कसा विचारावा, त्यात अपील कुठे करावे, आणखी माहिती कशी मिळवावी यावर आधारित असे हे अभ्यासक्रम असतील. प्रमाणपत्र अभ्यासक्रम जुलै २०१६ मध्ये सुरू होत आहे, तर पदविका अभ्यासक्रम २०१७ मध्ये सुरू होत आहे. दरवर्षी प्रवेशाची दोन सत्रे होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2015 12:06 am

Web Title: ignou to offer certificate diploma courses in rti soon
टॅग : Rti
Next Stories
1 भारतीय मुस्लिमांच्या दुर्दशेकडे संयुक्त राष्ट्र संघाने लक्ष द्यावे- आझम खान
2 व्हिडिओ: लालूंकडून मोदींच्या वक्तव्याचे ‘डबस्मॅश’
3 जर्मनी भारताचा नैसर्गिक भागीदार- नरेंद्र मोदी
Just Now!
X