22 October 2020

News Flash

मग्रूर नेत्याला धडा शिकवण्याची वेळ आली, ज्योतिरादित्य शिंदेंचा कमलनाथांवर निशाणा

ज्योतिरादित्य शिंदे यांची कमलनाथ यांच्यावर टीका

अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे असं म्हणत भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली आहे. कमलनाथ यांनी भाजपाच्या उमेदवारावर आक्षेपार्ह शेरेबाजी केली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. अशात भाजपाने कमलनाथ यांच्यावर टीकेचे बाण चालवले आहेत. कमलनाथ यांनी भाजपाच्या महिला नेत्याचा उल्लेख आयटम असा केला. यावरुन आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी कडाडून टीका केली आहे. एका गरीब आणि मजूर कुटुंबातून पुढे आलेल्या आमच्या नेत्या इमरती देवी यांचा उल्लेख कमलनाथ यांनी आयटम म्हणून केली. कमलनाथ यांची मानसिकता दाखवणाराच हा शब्द आहे. अशा मग्रुर नेत्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे.

मध्यप्रदेशच्या डबरा मतदार संघातून काँग्रेसचे सुरेंद्र राजेश हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी कमलनाथ आले होते त्यावेळी त्यांनी आमचे सुरेंद्र राजेश हे अत्यंत सरळ साध्या स्वभावाचे आहेत. ते त्यांच्यासारखे नाहीत, काय आहे त्यांचं नाव? मी त्यांचं नाव काय घेऊ, तुम्ही तर त्यांना चांगलं ओळखता, तुम्ही तर मला आधीच सावध करायला हवं होतं.. काय आयटम आहे. असं म्हणत कमलनाथ यांनी इमरती देवींवर टीका केली. इमरती देवी यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आहे. त्या ज्योतिरादित्य शिंदेंच्या कट्टर समर्थक मानल्या जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 10:26 pm

Web Title: jyotiraditya shinde scindia shivraj singh criticize kamalnath for controversial statement scj 81
Next Stories
1 पीडित कुटुंबांचा आवाज दाबला जात आहे, हा कोणता राजधर्म आहे? – सोनिया गांधी
2 कमलनाथ यांच्याविरोधात मध्य प्रदेश भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
3 आयएनएस चेन्नईवरुन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; नौदलाला आता दूरवर साधता येणार निशाणा
Just Now!
X