14 July 2020

News Flash

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर पतीने बॉम्बने उडवलं घर

पत्नीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने गावठी बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे

पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने गावठी बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अयोध्येतील काशीराम कॉलनीत हा प्रकार घडला असून परिसरात खळबळ माजली आहे. पतीने एकूण तीन बॉम्ब पत्नीच्या प्रियकरावर फेकले. यामधील दोन बॉम्ब फुटले, तर एक फुटू शकला नाही.

या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला असून, पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. अती संवदेनशील असणाऱ्या अयोध्येत हा बॉम्बस्फोट झाल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर झाले होते. मात्र तोपर्यंत आरोपी पती फरार झाला होता. पोलिसांनी प्रियकर आणि पत्नीला रुग्णालयात दाखल केलं.

अयोध्येतील कोतवाली येथील रायगंज चौकी क्षेत्रात आरोपी जयकिशन उर्फ जालिम सिंह आपल्या पत्नीसोबत वास्तव्यास आहे. शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जेव्हा तो कामावरुन घऱी परतला तेव्हा पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. यानंतर त्याला मोठा धक्का बसला. त्याने पत्नीच्या प्रियकरासोबत भांडण्यास सुरुवात केली.

काही वेळाने पती जामिल सिंह गावठी बॉम्ब घेऊन आला आणि पत्नीच्या प्रियकरावर एकामागून एक फेकण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला. तर पत्नी किरकोळ जखमी आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा जालिम सिंह फरार झाला होता. घटनास्थळाची पाहणी केली असता एका बॉम्ब सापडला. बॉम्बशोध पथकाच्या सहाय्याने तो तात्काळ निकामी करण्यात आला. पोलीस सध्या आरोपी पती जालिम सिंहचा शोध घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2020 9:04 am

Web Title: man hurls crude bombs after find wife with lover in ayodhya sgy 87
Next Stories
1 पोलिसांच्या वेशात मुलींच्या हॉस्टेलसमोर केले हस्तमैथुन; व्हिडिओ व्हायरल
2 आंदोलनांमागे कटकारस्थान!
3 भाजपच्या नेत्यांची मुक्ताफळे
Just Now!
X