27 February 2021

News Flash

मनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज, अद्यापही प्रकृती गंभीर; गोव्याकडे रवाना

पर्रिकरांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याने त्यांच्यावर गोव्यातील रुग्णालयात एम्समधील दर्जाचेच उपचार केले जाणार आहेत. त्याची तयारीही गोवा प्रशासनाने केली आहे.

मनोहर पर्रिकर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रविवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते एअर अॅम्ब्युलन्सने गोव्याकडे रवाना झाला आहेत. लवकरच ते गोव्यात पोहोचतील असे सुत्रांकडून कळते. दरम्यान, पर्रिकरांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याने त्यांच्यावर गोव्यातील रुग्णालयात एम्समधील दर्जाचेच उपचार केले जाणार आहेत. त्याची तयारीही गोव्या प्रशासनाने केली आहे.

एम्स सुत्रांच्या माहितीनुसार, सकाळी पर्रिकरांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना काही काळ आयसीयूत ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही वेळाने रुग्णालय प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. ६२ वर्षीय पर्रिकर १५ सप्टेंबरपासून दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्र्यांना एका विशेष एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीतून गोव्याला आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना पणजीतील आपल्या खासगी घरी राहतील.

प्रकृती बिघडलेली असल्याने बऱ्याच काळापासून गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात पर्रिकरांना उपस्थित राहता आलेले नाही. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत सरकारचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी शुक्रवारी त्यांनी गोवा भाजपाच्या कोर कमिटीची तसेच सहकारी पक्षांची बैठक एम्समध्ये बोलावली होती.

दरम्यान, भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी राज्यात कोणताही नेतृत्व बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी देखील गोव्यामध्ये पर्रिकरच मुख्यमंत्री असतील, असे सांगितले होते. फेब्रुवारी महिन्यापासून पर्रिकर स्वादूपिंडाच्या कर्करोगाने आजारी आहेत. गोव्यासह, मुंबईतील लीलावती रुग्णालय, अमेरिकेतील रुग्णालय तसेच आता दिल्लीतील एम्स रुग्णालय अशा विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 2:25 pm

Web Title: manohar parrikar discharged from aiims condition continues to be critical
Next Stories
1 #MeToo : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप
2 छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू
3 ‘भारताच्या एका सर्जिकल स्ट्राइकला पाकिस्तान १० वेळा उत्तर देईल’
Just Now!
X